चारुलता टोकस यांचे टिकेला उत्तर; सक्षम होती म्हणूनच पूर्ण केला कार्यकाळ

रूपेश खैरी
Thursday, 14 January 2021

लोकसभा निवडणुकीच्या काळातही अनेकांनी अशाच वावड्या उठविल्या होत्या. विरोधकांना बोलण्यासाठी काही ना काही लागते. पण, माझ्या बाबतीत त्यांच्याकडे हे एकच कारण असल्याने आपण समाधानी आहो.

वर्धा : महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस नेहमी दिल्ली निवासी असल्याने राज्यात महिला काँग्रेसचा विशेष प्रसार नसल्याची अनेकांनी टीका केली. यामुळेच त्यांचे पद गेल्याची चर्चा आहे. त्यावर राज्यात कॉंग्रेसची सत्ता नसताना आपण पक्षाची धुरा सांभाळली. दिल्लीत राहिली असती तर हे शक्‍य झाले नसते, प्रदेशाध्यक्षपदाची कालमर्यादा ऑक्‍टोबरमध्येच संपली होती, असे उत्तर चारुलता टोकस यांनी टीकाकारांना दिले.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत प्रभाताई राव यांची कन्या चारुलता टोकस यांनी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद भूषविले. आपल्यावरील आरोपांना उत्तर देतान त्या म्हणाल्या, या पदाचा त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे नव्याला संधी देण्यात आली. जर मी पद सांभाळण्यास सक्षम नसती तर पाच वर्षे पक्षाने मला या पदावर ठेवले नसते.

लोकसभा निवडणुकीच्या काळातही अनेकांनी अशाच वावड्या उठविल्या होत्या. विरोधकांना बोलण्यासाठी काही ना काही लागते. पण, माझ्या बाबतीत त्यांच्याकडे हे एकच कारण असल्याने आपण समाधानी आहो.

अधिक वाचा - जुळलेलं लग्न तुटलं अन् त्याच्या डोक्यात घुसला राक्षस; मुलगी आणि आईसोबत केलं धक्कादायक कृत्य

नव्या जबाबदारीस तयार

पक्षाने एका जबाबदारीतून मुक्‍त केले. यामुळे येत्या काळात काही ना काही नवी जबाबदारी येणार हे निश्‍चित. पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ते आपण स्वीकारू आणि पुढचा प्रवास सुरू ठेवू, असे चारुलता टोकस यांनी सांगितले.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Charulata Tokas says Was able to complete the term