

Chandrapur
esakal
चंद्रपूर: जिल्ह्यातील काही रेस्टॉरंट, हॉटेल्स, केटरर्स आणि फास्ट फूड विक्रेते अन्नपदार्थ तयार करताना पनीरऐवजी ‘चीज ॲनालॉग’चा वापर करतात. मात्र पनीर आणि चीज ॲनालॉग हे दोन्ही वेगवेगळे अन्नपदार्थ असून त्यांच्या पोषणमूल्यांमध्येही फरक आहे. परंतु याबाबत ग्राहकांना पुरेशी माहिती दिली जात नसल्याने ग्राहकांची दिशाभूल आणि फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे चीज ॲनालॉगचा वापर होत असल्यास त्याबाबत मेन्यू कार्ड किंवा दर्शनी भागात स्पष्ट उल्लेख करावा, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने हॉटेल मालकांना दिले आहेत.