काय हे दुर्दैव! छकुलीने जगात पाय ठेवले अन्‌ वडिलाने सोडले प्राण

file photo
file photo

पोंभुर्णा (जि. चंद्रपूर) : जन्म आणि मृत्यू कुणाच्याही हातात नाही. जन्म आनंद घेऊन येते; तर मृत्यू वेदना. या दोघांनी एकाचवेळी एका कुटुंबात दस्तक दिली. मुलगी झाल्याचा आनंद क्षणभरही साजरा झालेला नसताना एका वडिलावर मृत्यूने झडप घातली; तर आई होण्याच्या आनंदात रमलेल्या पत्नीच्या हृदयावर पतीच्या मृत्यूने विष ओकले.

निष्ठुर काळाने वडिलांना मुलीचे तोंडसुद्धा बघू दिले नाही अन्‌ जन्मताच मुलगी वडिलांच्या प्रेमाला पोरकी झाली. ही दुर्दैवी घटना पोंभुर्णा तालुक्‍यातील घनोटी नं. 1 येथील एका कुटुंबात घडली.

बाळंतपाणासाठी माहेरी आली होती महिला

तालुक्‍यातील घनोटी नं. 1 येथील गर्भवती महिला बाळंतपणाला माहेरी आली होती. मंगळवारी तिला प्रसवकळा सुरू झाल्या. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी पोंभुर्णा येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्रास वाढल्याने तिला चंद्रपूरला हलविण्यात आले.

वडिलाला रक्ताची उलटी झाली अन्‌ संपला खेळ

चंद्रपुरातील एका खासगी रुग्णालयात गर्भवतीला भरती करण्यात आले होते. यावेळी पती संतोष तिच्या सोबतीला होता. काही तासांनी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. रुग्णालयाच्या आवारात थांबलेल्या संतोषला ही गोड बातमी देण्यात आली. मुलीकडे जायला निघालेल्या संतोषला अचानक भोवळ आली. याच दरम्यान त्याला रक्ताची उलटी झाली आणि तो खाली कोसळला. संतोषला तत्काळ दुसऱ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

जन्म आणि मृत्यूचा दुर्दैवी योग

जन्म आणि मृत्यूच्या या दुर्दैवी योगायोगाने त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. संतोषच्या मृत्यूची बातमी गावात पोहोचताच सारे गाव हळहळले. शोकाकूल वातावरणात संतोषवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com