मुख्यमंत्री, कृष्णा खोपडे बिनविरोध?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

नागपूर : शहरात भाजपचे शेकडो उमेदवार लढण्यास इच्छुक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्‍चिम आणि आमदार कृष्णा खोपडे यांच्या पूर्व नागपूरमधून एकाही इच्छुकाने लढण्याचा दावा केला नाही.

नागपूर : शहरात भाजपचे शेकडो उमेदवार लढण्यास इच्छुक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्‍चिम आणि आमदार कृष्णा खोपडे यांच्या पूर्व नागपूरमधून एकाही इच्छुकाने लढण्याचा दावा केला नाही.
भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी रविभवन येथे घेण्यात आल्या. विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मुलाखती घेतल्या. उत्तर, दक्षिण आणि पश्‍चिम नागपूरमध्ये अनेकांनी दावे केले आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघासाठी एकाही इच्छुक मुलाखतीला आला नाही. मुख्यमंत्री स्वतः येथे उमेदवार असल्याने तसेही तिकीट कोणालाच मिळणार नव्हते. महाजनादेश यात्रेदरम्यान नागपूरला आले असता त्यांनी आपण दक्षिण-पश्‍चिमेतूनच लढणार असे जाहीर केले होते. त्यामुळे येथील संभाव्य इच्छुकांचे तसेही पत्ते कट झाले होते.
पूर्व नागपूरमध्ये आमदार कृष्णा खोपडे यांची चांगले बस्तान बसविले आहे. लोकसभेत नितीन गडकरी यांना सर्वाधिक मताधिक्‍य पूर्व नागपूरनेच मिळवून दिले. खोपडे यांनी तेव्हा दिग्गज समजल्या जाणारे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे संस्थान खालसा केले आहे. ते येथून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister, Krishna khopde unopposed?