esakal | सिंदी रेल्वेचा मुख्याधिकारी एसीबीच्या जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Chief Officer arrested for accepting bribe of Rs sixti housand

तक्रारीवरून अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात लाचखोर अधिकाऱ्याला ६० हजार रुपये देण्यात आले आहे. यानंतर याप्रकरणी २० ऑगस्ट २०२० रोजी एसीबीच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून मुख्याधिकारी झंवर याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे.

सिंदी रेल्वेचा मुख्याधिकारी एसीबीच्या जाळ्यात

sakal_logo
By
रूपेश खैरी

वर्धा : केलेल्या सिमेंट रस्त्याचे देयक काढण्यासाठी लाच मागणाऱ्या सिंदी (मेघे) नगरपालिकेचा मुख्याधिकारी कैलास श्रीनारायण झंवर (वय ४४) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. वर्ग दोनचा दर्जा असलेल्या या अधिकाऱ्याने देयक काढण्यासाठी ६० हजार रुपयांची मागणी केली होती.

तक्रारदार कंत्राटदाराने येथील सिमेंट रस्त्याचे काम केले. या कामापोटी त्याचे ३० लाख चार हजार ५०० रुपयांचे देयक होते. या कंत्रातदाराचे १० लाख रुपयांचे देयक शिल्लक होते. ते काढण्यासाठी या कंत्राटदाराला ६० हजार रुपयांची मागणी केली. यावरून कंत्रातदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठले व तक्रार दाखल केली.

तक्रारीवरून अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात लाचखोर अधिकाऱ्याला ६० हजार रुपये देण्यात आले आहे. यानंतर याप्रकरणी २० ऑगस्ट २०२० रोजी एसीबीच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून मुख्याधिकारी झंवर याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी - दररोज तुमचे रूप दाखवणारा आरसाच तुम्हाला करू शकतो कंगाल.. कसा ते वाचा

ही कारवाई पोलिस अधिक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर (ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर), राजेश दुद्दलवार (अप्पर पोलिस अधिक्षक, परिक्षेत्र नागपूर), तपास अधिकारी सुहास चौधरी (पोलिस निरीक्षक, ला. प्र. वि. वर्धा), गजानन विखे (पोलिस उपअधीक्षक), सुहास चौधरी, पोलिस निरीक्षक, पो. हवा संतोष बावनकुळे, रोशन निंबोलकर, नापोका अतुल वैद्य, पोशी सागर भोसले, प्रदीप कुचंकर, चालक पोशी नीलेश महाजन यांनी केली.

loading image
go to top