दररोज तुमचे रूप दाखवणारा आरसा तुम्हालाच करू शकतो कंगाल. कसा ते वाचा.. . 

Know how set up mirror in home As per Vastushastra
Know how set up mirror in home As per Vastushastra

नागपूर : आपल्या जीवनात वास्तुशास्त्राला फार महत्व आहे. नवीन घर बांधताना किंवा घरात काही बदल करताना  बहुतांश लोकं वास्तुशात्राप्रमाणे सर्व गोष्टी करतात. वास्तुशास्त्रातील योग्य नियमांनुसार काम किंवा घरात घडणार्‍या कोणत्याही गोष्टीची योग्य दिशा दिली जाते. आपल्याकडे वास्तुशास्त्राचे ज्ञान नसल्यास आपल्या घरात त्रास उद्भवू शकतो. 

बरेच लोक आपल्या घरातील काही गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे नसल्यामुळे संकटात सापडतात.  गोष्ट आहे ती म्हणजे आरसा. आरसा अनेकांचा आवडता असतो. पण हाच आरसा जर योग्य जागेवर नसेल तर तुम्हाला कंगाल करू शकतो. आज  आम्ही तुम्हाला वास्तुशस्त्राशी सबंधित काही टिप्स देणार आहोत 

काय सांगते वास्तुशास्त्र: 

  • आपल्या घरातील आरश्याची दिशा उत्तरेच्या भिंतीकडे वळवावी जर तुमचा आरसा गोलाकार असेल तर तो खूप शुभ आहे.   काचेचा आकार छोटा किंवा मोठा असला तरी तो नीट असणे फार गरजेचे आहे त्याला कोठेही दरार आलेली नसू नये.
     
  •  वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी  आपण कपड्याने आरसा झाकून झोपणे गरजेचे आहे. असे केल्याने आपल्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची वाईट छाया येणार नाही.
     
  • घरात आरसा ठेवण्यासाठी उत्तर पूर्व किंवा ईशान्य दिशेने लावा. या दिशेने आरसा ठेवल्यास घरात आनंद आणि समृद्धी येते.  बेडरूममध्ये दरवाजासमोर आरसा ठेवणे शुभ मानले जाते. 
     
  • आरसा आकारात मोठा असावा पण वजनाने हलका असावा.  घराच्या तिजोरी किंवा कपाटासमोर ठेवलेला आरसा शुभ मानला जातो यामुळे घरात संपत्ती वाढते. आरसा त तूटलेला ठेऊ नये. तसेच तो कायम स्वच्छ असणे खूप महत्वाचे आहे.
     
  • खोलीत आरसा अशा प्रकारे ठेवा की झोपताना आपल्या शरीराचा कोणताही भाग त्यात दिसणार नाही. कारण यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
     
  • खोली लहान असल्याने आरसा आपल्या पलंगासमोर ठेवला असेल तर रात्री झोपताना त्या आरशाला कपड्याने झाकून ठेवा. . घरात दक्षिण आणि पश्चिम दिशेने आरसा असणे अशुभ मानले जाते. 
     
  • आरसा खोलीच्या भिंतींवर समोरासमोर ठेवू नका. यामुळे घरात ताण येऊ शकतो. घरात प्रवेश करण्याच्या मार्गावर आरसा ठेवू नका. यामुळे सकारात्मक उर्जा घराबाहेर जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com