

Son Kills Parents and Commits Suicide in Buldhana
Sakal
चिखली : तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे ५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. स्वतःच्या आई-वडिलांची निघृण कुऱ्हाडीने हत्या करून मुलाने आत्महत्या केली. मृतांमध्ये सुभाष डिगंबर डुकरे (75), त्यांची पत्नी लता डुकरे (65) आणि मुलगा विशाल सुभाष डुकरे (42) यांचा समावेश आहे. हे तिघेही सावरगाव डुकरेचे रहिवासी होते.