अगोदर लावली जुगार खेळण्याची सवय, उधार दिले १२ लाख; वसुलीसाठी तगादा लावल्याने मुलाची आत्महत्या

Child commits suicide by demanding recovery of money Amravati crime news
Child commits suicide by demanding recovery of money Amravati crime news
Updated on: 

अमरावती : मुलाला जुगार खेळण्याची सवय लावून वारंवार १२ लाख रुपये उधार दिले. त्यानंतर पैसे मागण्याचा तगादा लावला. त्यामुळेच मुलाने गळफास लावून आत्महत्या केली, असा आरोप मृत व्यक्तीच्या पित्याने राजापेठ ठाण्यात दाखल तक्रारीत केला आहे. प्रशिक ऊर्फ सोनू उपसेन रंगारी (वय ३४, रा. सबनीस प्लॉट) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

राजापेठ पोलिसांनी सोमवारी सायंकाळी उपसेन सदाशिव रंगारी (वय ६३, रा. सबनीस प्लॉट) यांच्या तक्रारीवरून संशयित गोपाल पदम यादव, गोविंद पदम यादव व काल्या ऊर्फ गोपी पदम यादव (सर्व रा. सबनीस प्लॉट, अमरावती) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यापैकी काल्या ऊर्फ गोपी यादव याला अटक केली, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

सोमवारी सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तिन्ही यादव बंधूंनी मुलगा प्रशिक याला जुगार खेळण्यास प्रवृत्त केले. त्यासाठी वारंवार उधार पैसेही दिले. ही उधारी बारा लाखांवर पोहोचली. त्यानंतर पैसे मागण्यासाठी तिघांनी तगादा लावला. प्रशिक याला रविवारी एका ठिकाणी चर्चेसाठी बोलविले होते. बारा लाख रुपये देणे शक्‍य नसल्यास शेती तरी नावावर करून देण्यासाठी यादव बंधूंनी मुलाला धमकी दिली होती. तसे न केल्यास वडिलांना उडवून देण्याची धमकी दिली होती, असेही उपसेन रंगारी यांनी तक्रारीत म्हटले.

शवविच्छेदनास विलंब

संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना तातडीने अटक करावी, तोपर्यंत शवविच्छेदन करणार नाही, असा इशारा नातेवाइकांनी दिला होता. त्यामुळे शवविच्छेदन प्रक्रिया बऱ्याच वेळेपर्यंत रखडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com