पुरोगामी महाराष्ट्रात बालविवाहाचे प्रकार सुरूच... वर्ध्यात अनर्थ टळला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

मुलीच्या आईवडील व नातेवाईकास समज देण्यात येऊन बाल विवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आईवडील व नातेवाईक यांच्याकडून मुलगी १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत तिचा विवाह करणार नाही, असे हमीपत्र लिहून घेण्यात आले.

वर्धा : पुलगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील मुलीचा बालविवाह होणार आहे, असे  गाव बाल संरक्षण समितीच्या लक्षात आल्यामुळे समितीने बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत कार्यवाही करून विवाह थांबविला. विवाह होणाऱ्या अल्पवयीन मुलीचे वय १६ वर्षे दोन महिने नऊ दिवस असून ती अल्पवयीन असल्याचे  शाळेच्या दाखल्यावरुन सिद्ध झाले आहे.

यावेळी मुलीच्या आईवडील व नातेवाईकास समज देण्यात येऊन बाल विवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आईवडील व नातेवाईक यांच्याकडून मुलगी १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत तिचा विवाह करणार नाही, असे हमीपत्र लिहून घेण्यात आले.  बाल विवाहातून निर्माण होणाऱ्या अनिष्ट गोष्टीबाबत जाणीवजागृती आणि बाल विवाहाच्या प्रश्नाबाबत समाजामध्ये संवेदनशिलता निर्माण होण्याच्या दृष्टिकोणातून स्थानिक समुदायास मार्गदर्शन करण्यात आले, असे महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे. 

गाव बाल संरक्षण समितीने थांबविला बाल विवाह
गाव पातळीवर बाल सरंक्षण समिती ही बाल न्याय मुलांची काळजी व सरंक्षण अधिनियम  2000, 2006 च्या कलम  62 नुसार 0 ते 18 या वयोगाटातील मुलांच्या संरक्षणाकरीता निर्माण करण्यात आलेली गाव पातळीवर काम करीत असते. ही समिती मुलांच्या सरंक्षणाकरिता गाव पातळीवर संरक्षित वातावरण निर्मितीसाठी पुढाकार घेण्याची कामे करीत असतात. मुलांचे हित जोपासण्यासोबतच बालकांना मदत करण्याच्या भूमिकेतुन समिती निर्णय घेण्याचे कामे करीत असतात. तसेच बालकांचे शोषण करणाऱ्या व्यक्ती, कुंटूंब आणि संस्थाविरोधात भूमिका घेण्याचे सुद्धा काम करीत असतात.

"रेड झोन'बाबत मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंनी घेतली ही भूमिका..

समज देत पालकांकडून लिहून घेतले हमीपत्र
सदर बाल विवाह रद्द करण्याच्या कार्यवाहीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू,  जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी माधुरी भोयर, पुलगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक रवींद्र गायकवाड, आगरगावच्या सरपंच विभा राऊत, ग्राम पंचायत कर्मचारी संदीप भोगे, सरंक्षण अधिकारी  प्रफुल मेश्राम, अंगणवाडी सेविका संगिता झालक, पोलिस पाटील सचिन वडतकर, तंटामुक्ती सदस्य शिवदास सालोडकर, संदीप शिंगपुरे, वैशाली मिस्किीन, महेश कामडी, अमर कांबळे आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: child marriage case came in light at wardha