बालविवाहांचे सत्र सुरूच; बालसंरक्षण कक्षाने रोखले एकाच दिवशी दोन विवाह

बालविवाहांचे सत्र सुरूच; बालसंरक्षण कक्षाने रोखले एकाच दिवशी दोन विवाह

अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) : आज जिल्ह्यामध्ये बालविवाहांचे प्रमाण वाढले (Child marriage increased) आहेत. परंतु, बालसंरक्षण कक्ष याबाबत सतर्क असून, आतापर्यंत जिल्ह्यात अनेक बालविवाह रोखण्यात यश आले आहे. एकाच दिवशी दोन बालविवाह रोखण्यात आले (Prevented two child marriages) आहे. (Child marriage session continues; Two marriages on the same day prevented in the child protection cell)

अंजनगावसुर्जी तालुक्‍यातील एका गावात पंधरा वर्षीय बालिकेचा बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्या माहितीनुसार जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अजय डबले व भूषण कावरे यांनी अंजनगाव पोलिस ठाण्याच्या सहकार्याने व ग्राम बालसंरक्षण समितीच्या माध्यमातून बालविवाह रोखला. गावामध्ये उपस्थितांची चौकशी करण्यात आली. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह न करण्याबाबत बंधपत्र लिहून घेण्यात आले.

बालविवाहांचे सत्र सुरूच; बालसंरक्षण कक्षाने रोखले एकाच दिवशी दोन विवाह
महिला दुकानदारावर बलात्कार; नागपुरातील जरीपटक्यातील घटना

अशाच प्रकारचा १७ वर्षीय बालिकेचा बालविवाह होत असल्याची माहिती मनोदय समाज विकास संस्था चाइल्डलाइन, वाशीमकडून बालसंरक्षण कक्ष अमरावतीला प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे नांदगावखंडेश्‍वरचे बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. गलफट यांनी पोलिस ठाण्याला लेखी कळविले. पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने बालिकेच्या घरी भेट देऊन होणारा बालविवाह रोखण्यात आला. सदर मुलीच्या पालकांकडून मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही, असे लिहून घेण्यात आले. सदर कार्यवाहीमध्ये जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे अजय डबले, भूषण कावरे, सीमा भाकरे, बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. गलफट, अंगणवाडी सेविका यांनी सहकार्य केले.

(Child marriage session continues; Two marriages on the same day prevented in the child protection cell)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com