esakal | अमरावतीत चाइल्डलाइन व पोलिसांनी रोखला बालविवाह, पालकांची घातली समजूत
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पोलिस उपनिरीक्षक अयुब शेख यांनी पालकांची समजूत काढली. दोन्ही पक्षांच्या नातेवाइकांना नागपुरीगेट ठाण्यात बोलविले. चर्चेअंती मुलामुलीच्या पालकांकडून ठाण्यात अल्पवयीन मुलीसोबत विवाह न करण्याबाबतचे संमतिपत्र लिहून घेतले, त्यानंतरच हा विवाह टळला.

अमरावतीत चाइल्डलाइन व पोलिसांनी रोखला बालविवाह, पालकांची घातली समजूत

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती  : हलाखीच्या परिस्थितीत पालकांनी अल्पवयीन मुलीचा विवाह करण्याचा निर्णय घेतला. परंतु चाइल्डलाइन व नागपुरीगेट पोलिसांच्या मध्यस्थीने बालविवाह टळला. चाइल्डलाइनच्या क्रमांकावर कुणीतरी नागपुरीगेट हद्दीत बालविवाह सुरू असल्याची माहिती दिली होती.

चाइल्डलाइनच्या पदाधिकाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. तसे पत्र पोलिस अधिकाऱ्यांना देऊन मदतीची मागणी केली. पोलिस उपनिरीक्षक अयुब शेख चाइल्डलाइनच्या सदस्यांसह त्या परिसरात पोहोचले. शोध घेत असतानाच १६ वर्षे ९ महिने वयाच्या मुलीचा विवाह २२ वर्षीय युवकासोबत होणार होता. मुलीचे पालक हे मोलमजुरी करणारे असून त्यांचे काही नातेवाईक नागपुरीगेट हद्दीत राहतात. मुलीच्या लग्नाकरिता ते आले होते.

जाणून घ्या : सोमवारचा दिवस सर्वात लहान तर रात्र मोठी; अनुभवता सुद्धा येणार गुरू-शनीची महायुती

मुलगी अठरा वर्षांखालील

पोलिस व चाइल्डलाइनचे पदाधिकारी सकाळी साडेदहाच्या सुमारास विवाहस्थळी पोहोचले. तयारी सुरू असताना पोलिसांनी त्यांच्या पालकांची चौकशी केली. मुलाचे वय २२ होते. परंतु मुलगी अठरा वर्षांवर असल्याचे कोणतेही अधिकृत पुरावे चाइल्डलाइन किंवा पोलिसांपुढे पालक सादर करू शकले नाहीत.

आधी केला कारवाईला विरोध

पालकांसह परिसरातील नागरिकांनी चाइल्डलाइनच्या कारवाईला आधी विरोध केला. पोलिस उपनिरीक्षक अयुब शेख यांनी पालकांची समजूत काढली. दोन्ही पक्षांच्या नातेवाइकांना नागपुरीगेट ठाण्यात बोलविले. चर्चेअंती मुलामुलीच्या पालकांकडून ठाण्यात अल्पवयीन मुलीसोबत विवाह न करण्याबाबतचे संमतिपत्र लिहून घेतले, त्यानंतरच हा विवाह टळला. या वेळी जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या ऍड. सीमा भाकरे उपस्थित होत्या.

अवश्‍य वाचा  : धक्कादायक! सुशिक्षितांच्या शहरात घरीच प्रसूती; गेल्या ११ महिन्यांत तब्बल ८५ बाळांचा जन्म

पालकांमधील गैरसमज झाले दूर
अनेकांना कायद्यातील तरतुदीची माहिती नव्हती. ती दिल्यानंतर मुलामुलीच्या पालकांमधील गैरसमज दूर झाल्याने बालविवाह टळला.
- अयुब शेख, पोलिस उपनिरीक्षक, नागपुरीगेट ठाणे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले) 

loading image