esakal | बालमृत्यू, मातामृत्यूचे ग्रहण सुटेना; मेळघाटात स्थिती चिंताजनक
sakal

बोलून बातमी शोधा

child mortality

बालमृत्यू, मातामृत्यूचे ग्रहण सुटेना; मेळघाटात स्थिती चिंताजनक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : पावसाळ्याच्या दिवसात गावांचा तुटलेला संपर्क, आरोग्य केंद्रांमध्ये बालरोगतज्ज्ञ, प्रसूतीतज्ज्ञांची वानवा ही सर्व संकटे कायम आहेत. त्यातच मागील वर्षी मेळघाटात झालेले ११३ उपजत मृत्यू (child mortality rate melghat) तसेच १० मातामृत्युमुळे आरोग्य प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली गेली. बाळांचे तसेच मातांचे झालेले मृत्यू आरोग्य प्रशासनासाठी डोळ्यात अंजन घालणारे ठरणार आहे.

हेही वाचा: पोलिसांनी सर्वांसमोर केली मारहाण; अपमानित झाल्याने आत्महत्या

सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसांत मेळघाटातील अनेक गावांचा संपर्क तुटत आहे. पर्यायाने गर्भवती मातांना आरोग्यसेवा मिळत नसल्याने त्यांना जिल्हा स्त्री रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. विशेष म्हणजे प्रसूतीतज्ज्ञांची पदेसुद्धा रिक्त आहेत. सेमाडोह प्राथमिक आरोग्यकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कमी वजनाच्या मुलांना दवाखान्यात दाखल करण्यास त्यांचे आईवडील तयार होत नाहीत, अशी स्थिती आहे.

अनेक गावांमध्ये प्रसूत झालेल्या मातांच्या बाळांचे वजन अतिशय कमी आहे. त्यांना योग्य तो औषधोपचार मिळत नसल्याने अनेक बाळांनी जगात आल्या आल्याच निरोप घेतला आहे. शासनाकडून वारंवार आश्वासने देण्यात आली असली तरी अनेक आरोग्यकेंद्रांमध्ये बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ जाण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत स्थानिक नागरिकांना अमरावती, तसेच परतवाड्याकडे धाव घ्यावी लागते. उपचारासाठी वेळ मिळत नसल्याने अनेक बालकांचा मृत्यू ओढवत आहे.

असे झालेत बालमृत्यू -

वयोगट मृत्यूसंख्या

  • ० ते ७ दिवस - ८१

  • ८ ते २८ दिवस - ३४

  • २९ दिवस ते १ वर्ष - ५७

  • १ ते ३ वर्ष - ३०

  • ३ ते ५ वर्ष - १२

  • ५ ते ६ वर्ष - ००

  • उपजत मृत्यू - ११३

  • मातामृत्यू - १०.

मेळघाटमधील उपजत मृत्यू, बालमृत्यू व मातामृत्यूच्या नियंत्रणासाठी शासनाने तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, शासनाकडून कुठलीही कार्यवाही करण्यात येत नाही. मानवाधिकार आयोगानेसुद्धा याची दखल घेतली. परंतु, त्याचा कुठलाच फायदा झालेला नाही.
-अ‍ॅड. बंड्या साने, खोज संस्थापक.
loading image
go to top