
उमरखेड (जि. यवतमाळ) : एकादशी प्रमाणेच भागवत एकादशी अत्यंत पुण्यप्रद एकादशी मानल्या जाते. अशा या पवित्र भागवत एकादशीच्या दिवशी उमरखेड येथील चिन्मयमूर्ती संस्थांचे मठाधिपती माधवानंद महाराज यांच्या हस्ते श्रीहरी पांडुरंगाच्या चरणी २१ तोळे सोन्याचा हार अर्पण करण्यात आला.