कपडे बदलताना शिक्षिकेचे काढले फोटो 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

नागपूर - घरात महिला कपडे बदलत असताना शेजारी राहणाऱ्या विद्यार्थ्याने खिडकीतून मोबाईलने फोटो काढले, तसेच व्हिडिओ शूटिंगही केल्याची धक्कादायक घटना घडली. खिडकीतील ब्रश ठेवण्याचे स्टॅंडला धक्‍का लागल्यामुळे ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नेहल कमलाकर थोटे (वय 19, रा. गणेश पेठ) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. 

नेहल हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील रहिवासी आहे. तो शिक्षणासाठी नागपुरात आला होता. त्याने गणेश पेठमधील कर्नलबाग परिसरात भाड्याने एक खोली घेतली होती. त्याच्या शेजारी 40 वर्षीय शिक्षिका पती व दोन मुलांसह राहते. मंगळवारी शिक्षिकेच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम होता. रात्री कार्यक्रम संपल्यानंतर ती पतीसह बेडरूममध्ये गेली. त्या वेळी आरोपीने त्याच्या घराच्या खिडकीतून महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढले. खिडकीतील ब्रश खाली पडल्याने महिलेचे लक्ष गेले. तर, तो मोबाईल घेऊन पळताना दिसला. महिलेने लगेच पतीला माहिती दिली. मध्यरात्रीच्या सुमारास मुलाची विचारपूस केली. त्याला लगेच गणेश पेठ पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्या मोबाईलमधून अश्‍लील क्‍लिप्स जप्त करण्यात आल्या. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 

Web Title: Clothes changing teacher took photos