esakal | दिवस सणांचे अन चोरट्यांनी फोडले कपड्याचे दुकान
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दिवस सणांचे अन चोरट्यांनी फोडले कपड्याचे दुकान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : गजबजलेल्या महाल परिसरातील नामांकित कापडाचे दुकान चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख आणि 15 हजारांचे कपडे लंपास केले. ही घटना सोमवारी उघडकीस आली. कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित जुगलकिशोर अरोरा (30, रा. रतन कॉलनी, सोनाजीची वाडी, महाल) यांचे महालमधील आयचित मंदिर रोड, नटराज टॉकीजजवळ आकाश मॉल नावाचे कपड्याचे दुकान आहे. 31 ऑगस्टला सायंकाळी 6.30च्या सुमारास ते दुकानाला कुलूप लावून घरी गेले. चोरट्याने दुकानातील दोन लाख रुपये नगदी आणि 15 हजारांचे कपडे असा एकूण दोन लाख 15 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. दुकान मालकाच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
टोळीत लहान मुलांचा समावेश
कपड्याचे दुकान फोडण्यासाठी आलेल्या चोरट्यांच्या टोळीमध्ये लहान मुलांचा समावेश असावा. व्हेंटिलेटरच्या खिडकीतून दुकानात प्रवेश करण्यात आला. त्यामुळे व्हेंटिलेटरच्या खिडकीतून लहान मुलाला दुकानात घुसविण्यात आले असावे. त्यानंतर दार उघडून चोरी केल्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

loading image
go to top