
नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पांढरदेव परिसर, देऊळगावराजा तालुका आणि यवतमाळ जिल्ह्यातील मुळावा येथे शनिवारी (ता.९) रोजी ढगफुटी सदृश पाऊस झाला. असोला जहाँ, चिंचोली परिसरात अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस पिके पाण्यात गेली तर काही घरात पाणी शिरले आहे. या पावसामुळे अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.