मुख्यमंत्र्यांनी पाच लाखांत उरकली निवडणूक!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

नागपूर : विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लढत असलेल्या दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघात अख्ख्या देशाचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाखांच्या आतच ही निवडणूक लढविली. विशेष म्हणजे त्यांचे विरोधी कॉंग्रेसचे उमेदवार आशीष देशमुख यांनी 11 लाखांच्यावर खर्च केला. निवडणुकीत प्रत्येक उमेदवारांना तीन टप्प्यांत खर्चाची माहिती देणे आवश्‍यक आहे. सर्व उमेदवारांनी खर्चाची माहिती निवडणूक विभागाला दिली आहे. यानुसार निवडणुकीत शहरात भाजपपेक्षा कॉंग्रेसने जास्त पैसा खर्च केला. 

निवडणूक विभागाला दिलेल्या माहितीनुसार  

दक्षिण-पश्‍चिम नागपूरमधील भाजप उमेदवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 लाख 89 हजार 195 रुपये खर्च केले. तर आशीष देशमुख यांनी 11 लाख 40 हजार 920 रुपये खर्च केले. 

दक्षिण नागपूरमधील भाजप उमेदवार मोहन मते यांनी 8 लाख 50 हजार 306 रुपये खर्च केल्याचे दर्शविले आहे. तर कॉंग्रेस उमदेवार गिरीश पांडव यांनी 6 लाख 12 हजार 187 रुपये खर्च केले. अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांनी 7 लाख 74 हजार 548 रुपये खर्च केल्याचे नमूद केले आहे. 

पूर्व नागपूरचे कॉंग्रेस उमेदवार पुरुषोत्तम हजारे यांनी 9 लाख 53 हजार 10 रुपये तर भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे यांनी 7 लाख 56 हजार 565 रुपये खर्च केले. मध्य नागपुरात कॉंग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी 8 लाख 72 हजार 935 रुपये तर भाजप उमेदवार विकास कुंभारे यांनी 5 लाख 79 हजार 397 रुपये खर्च केले. 

पश्‍चिम नागपूरमध्ये अपक्ष उमेदवार मनोज सिंह यांनी कॉंग्रेस, भाजप उमेदवारांपेक्षा जास्त खर्च केला. त्यांनी 8 लाख 37 हजार 893 रुपये खर्च केल्याचे नमूद केले. भाजपचे सुधाकर देशमुख यांनी 6 लाख 74 हजार 870 रुपये तर कॉंग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी 6 लाख 54 हजार 245 रुपये खर्च केले. 

उत्तर नागपूरमध्ये बसप उमेदवार सुरेश साखरे हे खर्चात आघाडीवर आहेत. त्यांनी 5 लाख 14 हजार 196 रुपये खर्च केले. कॉंग्रेसचे उमेदवार नितीन राऊत यांनी 3 लाख 58 हजार 795 रुपये तर भाजप उमेदवार मिलिंद माने यांनी 3 लाख 10 हजार 877 रुपये खर्च केल्याचे दर्शविले आहे. सर्वांत कमी खर्चाची निवडणूक उत्तर नागपूरमध्ये झाल्याचे दिसते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM cleared election in just five lakh!