Vidhan Sabha 2019 : जोरदार शक्तिप्रदर्शन करत मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज दाखल

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही नावाचा समावेश आहे.

नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यानंतर आज (शुक्रवार) मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रॅली काढली होती. त्यानंतर पत्नी अमृता फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य नेतेमंडळींच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी कांचन यांचे आशीर्वाद घेतले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis File Nomination Form Maharashtra Vidhan Sabha 2019