CM Devendra Fadnavis: संपूर्ण राज्यच दत्तक घेतले : मुख्यमंत्री फडणवीस
Yavatmal Development: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. आदिवासी समाजासाठी विविध योजना आणि ३३५ कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला.
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. जिल्ह्याला आवश्यक तो निधी उपलब्ध करून देईल. मी यवतमाळच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रच दत्तक घेतला आहे, असे विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.