Live Updates भंडारा जिल्हा नवजात शिशू दुर्घटना : आगप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश

टीम ई सकाळ
Saturday, 9 January 2021

मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून, त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत. मृत बालकाच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची दिली.

भंडारा : येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून, त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत. मृत बालकाच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची दिली.

Big Breaking : भंडारा जिल्हा रुग्णालयात आग; १० नवजात बालकांचा मृत्यू, ७ जणांना वाचविण्यात यश

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. शनिवारच्या मध्यरात्री जवळपास दोन वाजताच्या सुमारात ही आग लागली. यात सतरा बालकांपैकी सात बालकांना वाचविण्यात यश आलेला आहे.

शनिवारी रात्रीच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्ण युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितला असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अग्निशमक दल घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

जाणून घ्या - 'तिच्या' घरी सुरु होती लग्नाची लगबग पाहुणेही होते तयार; तेवढ्यात आला फोन अन् एका क्षणात सगळंच संपलं

या SNCU मध्ये फुटबॉल आणि इन वन अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालक वाचविण्यात आले. तर औट बॉल युनिटमधील दहा मुलांचा मृत्यू झाला.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM orders immediate inquiry into fire Bhandara fire news