
घरी पाहुण्यांचे आगमन झाले असून लगीनघाईला सुरुवात झाली होती. मात्र महाविद्यालयाच्या कार्यालयीन कामकाजाची काही कागदपत्रे नीलिमाला वरोरा येथे पोचते करायचे होते.
उमरेड (जि. नागपूर) : नववर्षाची सुरुवातच जणू अपघातांच्या मालिकेने झाली असे म्हणणे वावगे ठरणार नाही आणि विशेष म्हणजे उमरेड पासून गिरड - समुद्रपूर आणि हिंगणघाट जाणाऱ्या मार्गावरच ही अपघातांची सुरू आहे आणि त्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मृतांचा आकडा हा चिंताजनक आहे.
गुरुवारी स्थानिक घुमडे ले-आउट येथील रहिवासी डॉ. नीलिमा सुखदेव नंदेश्वर वय - ३५ वर्षे या तरुणीचा समुद्रपूर शिवारात मार्गात मोठा दगड आल्याने वाहन अनियंत्रित होऊन मृत्यू झाला .
मृतक डॉ नीलिमा नंदेश्वर ह्या एम एस्सी , पीएचडी अर्थशास्त्र असून वरोरा च्या आनंदवन कृषी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत , तीन दिवसांनंतर त्यांचे लग्न नागपूरच्या दंत चिकित्सक डॉ अश्विन खेमराज टेम्बेकर याच्याशी होणार होता मात्र नियतीला ते मान्य नसावे .तोंडावर लग्न आल्याने घरात आनंददायी वातावरण होते अश्यातच घरी पाहुण्यांचे आगमन झाले असून लगीनघाईला सुरुवात झाली होती. मात्र महाविद्यालयाच्या कार्यालयीन कामकाजाची काही कागदपत्रे नीलिमाला वरोरा येथे पोचते करायचे होते. म्हणून त्या आपल्या आई ला सोबत घेऊन अल्टो कारने वरोरा जाण्यास मार्गस्थ झाल्या. परंतु वाटेत एक धोंडा काळ बनून वाटच पाहत होता की काय .
अपघातावेळी आई होती सोबत
नीलिमा लहान असतांनाच वडिलांचे छत्र हरपले ,आई नगर परिषदेच्या शाळेत शिक्षिका असून नीलिमा सोबत अन्य बहीण व भावाचे संगोपन सोबतच उच्च शिक्षित केले . नीलिमाला उच्च शिक्षिका म्हणून बंगलोर च्या विद्यापीठाने सन्मानित केले आणि पीएचडी सुद्धा बहाल केली . मात्र नियतीने आपला डाव साधला. अपघाताचे वेळी निळीमच्या सोबत सेवानिवृत्त शिक्षिका म्हणजे त्यांच्या आई होत्या , त्यांना पायाला दुखापत होऊन त्या जखमी झाल्या.
स्वप्नांची राख झाली रांगोळी
त्यांचा होणारा नवरा डॉ अश्विन हा दंत चिकित्सक असून नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात डेंटल सर्जन म्हणून कार्यरत आहे अश्विन सोबत होणाऱ्या विवाहाच्या पश्चात नीलिमा व अश्विन ने अनेक स्वप्ने रंगविली होती त्या सदाबहार स्वप्नांची राख रांगोळी झाली ,नीलिमा च्या निधनाने संबंध उमरेड शहरात शोककळपासरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे कारण उमरेडकरांनी एक होतकरू प्राध्यापिका गमावली आहे .
अपघातांची मालिका
गिरडच्या ताजुद्दीन बाबांच्या दर्शनावरून ऑटो ने येणाऱ्या एका कुटुंबाचा टिप्पर ने दिलेल्या धडकेत नुकताच अपघात झाला त्यात चार जण जागीच दगावले त्यानंतर लगेच एक दोन दिवसांनी उमरेड तालुक्यातील हिवरा - हिवरी गावातील नऊ तरुण एक खासगी वाहनाने गणपतीपुळे जाणार होते त्यांचा हिंगणघाट येथे त्यांच्या वाहनांची उभ्या ट्रक वर धडक झाली त्यात सुद्धा चार तरुणांचा जीव गेला
संपादन - अथर्व महांकाळ