yavatmal district cold
यवतमाळ - गेल्या काही दिवसांपासून वातावरणात चांगलाच बदल झाला आहे. दुपारच्या सुमारास उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. परंतु सायंकाळच्या सुमारास हुडहुडी वाढत आहे. थंडीचा जोर आता वाढल्याचे दिसून येत आहे. शनिवारी (ता. 14) उन्हाचा पारा 33.4 अंशावर घसरला होता. तर रात्री 12.4 अंश पोहचला होता.