‘वंचित’च्या बंदचा भाजप आमदाराला फटका

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 January 2020

बंदला विविध संघटनांनी प्रतिसाद दिला. अत्यावश्‍यक सेवा वगळता जिल्ह्यात कडकडीत बंद ठेवण्यात आला. या बंदचे ‘वंचित’चे कार्यकर्ते अकोला शहरात आवाहन करत होते. 

अकोला : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यात सीएए व एनआरसीच्या विरोधात बंदचे आवाहन केले आहे. त्याअनुषंगाने आज (ता.24) ‘वंचित’चे कार्यकर्ते शहरात दुकान बंद करण्याचे आवाहन करत असताना एका हॉटेलमध्ये भाजपचे आमदार चहा पीत बसले होते. यावर आमदारांची कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात शाब्दिक बोलचाल झाली. या प्रकारामुळे आमदारांच्या चहा पिण्यात व्यत्यय आला व हा विषय परिसरात चर्चेचा ठरला.

सुधारीत नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नाेंदणीच्या (एनआरसी) विराेधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवार, 24 जानेवारी राेजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला विविध संघटनांनी प्रतिसाद दिला. अत्यावश्‍यक सेवा वगळता जिल्ह्यात कडकडीत बंद ठेवण्यात आला. या बंदचे ‘वंचित’चे कार्यकर्ते अकोला शहरात आवाहन करत होते.

हेही वाचा - मुख्याधिकारी व उपनगराध्यक्ष यांच्यात शाब्दिक चकमक

आमदार व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बोलचाल
रेल्वे स्टेशन चौकातील एका चहा दुकानावर भाजपचे आमदार रणधीर सावरकर हे चहा पीत होते. यावेळी काही ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांनी चहाच्या दुकानदाराला बंदचे आवाहन केले यावर आमदारांची व कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात शाब्दिक बोलचाल झाली. मात्र, या प्रकारामुळे आमदारांच्या चहा पिण्यात व्यत्यय आला. हा विषय परिसरात चर्चेचा ठरला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक दिसून आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: colloquial between mla and vanchit's activists