esakal | जळत्या चितेवर कोसळले काँक्रीटचे दहन शेड, ग्रामस्थ थोडक्यात बचावले
sakal

बोलून बातमी शोधा

जळत्या चितेवर कोसळले काँक्रीटचे दहन शेड, ग्रामस्थ थोडक्यात बचावले

जळत्या चितेवर कोसळले काँक्रीटचे दहन शेड, ग्रामस्थ थोडक्यात बचावले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : 'शेवटचा क्षण हा सुखाचा व्हावा', असे भारतीय संस्कृतीत अपेक्षा व्यक्त केली गेली आहे. मात्र, पुसद तालुक्यातील निंबी (nimbi of pusad) येथे महिलेच्या अंत्यसंस्कारावेळी चक्क सिमेंट काँक्रीटचे दहन शेड (combustion shed of concrete) जळत्या चितेवर अचानक कोसळले. सुदैवाने प्राणहानी टळली. मात्र, चितेवरील पार्थिव अर्धवट जळाले. ही घटना शनिवार ता. १७ रोजी दुपारी तीनच्या दरम्यान घडली. या विचित्र प्रकारामुळे निंबी शिवारात नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्याचवेळी ग्रामपंचायतने केलेल्या निकृष्ट बांधकामाचे पितळ उघडे पडले. (combustion shed of concrete collapsed on the burning dead body in yavatmal)

हेही वाचा: अवघ्या तीन क्लिकमध्ये मिळेल रुग्णवाहिका, तरुणानं तयार केलंय भन्नाट अ‌ॅप

पुसदपासून चार किलोमीटर अंतरावरील निंबी येथील रहिवासी महिला रुक्मा साहेबराव हराळ ( वय ५५) यांचे कर्करोगाने शनिवारी सकाळी आठ वाजता निधन झाले. त्यांच्या अंतिम संस्कारासाठी नातेवाईक व परिसरातील नागरिक जमले. दुपारी तीन वाजता स्मशानभूमीत ग्रामपंचायतने बांधलेल्या दहन शेडमध्ये सरण रचण्यात आले. पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर काही क्षणातच नकळत मोठा आवाज झाला. त्याचवेळी सिमेंट काँक्रीटचा दहन शेडचा बांधलेला स्लॅब अचानक कोसळला. त्याखाली पार्थिव व सरण पूर्णपणे दबल्या गेले. अचानक घडलेल्या या घटनेने सर्वजण अवाक् झाले. सरणाजवळ जमलेली मंडळी बाजूला सरकल्याने प्राणहानी टळली.

सिमेंट काँक्रीटच्या स्लॅब खाली दबलेल्या पार्थिव व सरणाला बाहेर कसे काढावे? असा मोठा प्रश्न अंत्यसंस्काराला जमलेल्या नागरिकांना पडला. दरम्यान, सरपंच व ग्रामसेवकांना ही घटना कळविण्यात आली. परंतु, सायंकाळपर्यंत घटनास्थळी कुणीही पोहोचले नव्हते. या दहन शेडचे ग्रामपंचायतीने तीन वर्षापूर्वीच बांधकाम केलेले आहे. निकृष्ट बांधकामामुळे हा अपघात घडला. याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

loading image