esakal | हैद्राबाद येथून येणाऱ्या 18 मजुरांना केले क्वारंटाइन
sakal

बोलून बातमी शोधा

hivrkhed majur.jpg

मध्यप्रेदशात विविध ठिकाणी रहिवासी असलेले 18 मजूर हे काही दिवसांपूर्वी हैद्राबाद येथे कामासाठी गेले होते. लॉकडाउनमुळे कामधंदे बंद पडल्याने त्यांच्या रोजागावरही त्याचा परिणाम झाला. परिणामी या मजुरांनी गावाकडे प्रयाण घेण्याचा निर्णय घेतला. 29 मार्चला ते हैद्राबाद येथून पायी निघाले.

हैद्राबाद येथून येणाऱ्या 18 मजुरांना केले क्वारंटाइन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिवरखेड (जि. अकोला) : हैद्राबाद येथून मध्यप्रदेशात जाणाऱ्या सुमारे 18 मजुरांना झिरी गेटजवळ मेळघाट व्याघ्र प्रकल्प व वनविभागाच्या पथकाने सतर्कता दाखवित ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस करून हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांची तपासणी केली असता 18 जणांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी क्वारंटाइन केले.

हेही वाचा- अकोला येथे आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह, दुसरा अकोटफैलातील

हैद्राबादमधून पायी प्रवास
मध्यप्रेदशात विविध ठिकाणी रहिवासी असलेले 18 मजूर हे काही दिवसांपूर्वी हैद्राबाद येथे कामासाठी गेले होते. लॉकडाउनमुळे कामधंदे बंद पडल्याने त्यांच्या रोजागावरही त्याचा परिणाम झाला. परिणामी या मजुरांनी गावाकडे प्रयाण घेण्याचा निर्णय घेतला. 29 मार्चला ते हैद्राबाद येथून पायी निघाले. वाशीम, हिंगोली, बार्शीटाकळी, अकोला, अकोट मार्गे ते बुधवारी (ता.8) येथून नजीक असलेल्या झिरी गेटजवळ पोहोचले. त्यानंतर वनविभाग व मेळाघाट व्याघ्र प्रकल्पाच्या पथकाने तातडीने दक्षता घेत सर्व मजुरांची विचारपूस केली. त्यानंरत हैद्राबाद येथून आल्याचे त्यांनी सांगितल्याने. त्यांना तातडीने प्राथमिक चाचणीसाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून त्यांची तपासणी करण्यात आली. खबरदारी म्हणून त्यांना 14 दिवसांसाठी आरोग्य विभागाच्यावतीने क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी वैशाली ठाकरे यांनी दिली. सदर मजुरांच्या राहण्याची व्यवस्था ग्रामविकास अधिकाऱ्यांनी केली.


कुठेच तपासणी कशी नाही?
हैद्राबद ते अकोला (महाराष्ट्र) असा सुमारे 400 किलोमीटर पेक्षा अधीकचा प्रवास सदर मजुरांनी केली. ठिकठिकाणी पोलिसांकडून अडवून नागरिकांना विचारपूस केली जात आहे. जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहे. असे असतानाही 18 मजुरांची मार्गात कुठेच तपासणी कशी 

loading image