esakal | आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन, प्रतिष्ठानवर गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

crime

महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिलेल्या आदेशानंतर डॉ. सचिन बोंद्रे यांचे पथक बडनेरा मार्गावरील वॉलमार्ट या व्यापारी संकुलामध्ये तपासणीसाठी गेले असताना ही धक्कादायक माहिती पुढे आली. त्यामुळे वॉलमार्ट अमरावतीच्या संचालकांसह एकूण वीस जणांविरुद्ध बडनेरा ठाण्यात गुरुवारी (ता. सात) रात्री गुन्हे दाखल करण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन, प्रतिष्ठानवर गुन्हा दाखल
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अमरावती : शहरातील कोरोना कंटोन्मेंट झोन परिसरातील 19 कामगार ठेवून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वॉलमार्ट अमरावतीच्या संचालकांसह एकूण 20 जणांवर बडनेरा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. 

महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिलेल्या आदेशानंतर डॉ. सचिन बोंद्रे यांचे पथक बडनेरा मार्गावरील वॉलमार्ट या व्यापारी संकुलामध्ये तपासणीसाठी गेले असताना ही धक्कादायक माहिती पुढे आली. त्यामुळे वॉलमार्ट अमरावतीच्या संचालकांसह एकूण वीस जणांविरुद्ध बडनेरा ठाण्यात गुरुवारी (ता. सात) रात्री गुन्हे दाखल करण्यात आले. लॉकडाउनच्या काळात हे व्यापारी संकुल निर्धारित वेळेत सुरू राहत होते. त्यामुळे ग्राहकांची बरीच गर्दी राहायची. महापालिकेच्या पथकाने येथे पाहणी केली. 

जी मंडळी येथे काम करीत होती त्यांना राहण्याचे ठिकाण विचारले असता, ही मंडळी ताजनगर, हबीबनगर, आझादनगर, इतवारा, गौसनगर परिसरातील रहिवासी असल्याचे निदर्शनास आले. वॉलमार्टसारखी मोठी व्यापारी प्रतिष्ठाने अशा स्थितीत प्रशासनाचे आदेश धुडकावून नागरिकांचा जीव धोक्‍यात घालीत असल्याचे लक्षात आल्याने महापालिकेच्या कारवाई  पथकाने वॉलमार्ट संचालकांना त्याचवेळी नोटीस बजावली. मात्र, त्यांनी नोटीसला उत्तर दिले नाही. त्यामुळे संचालकांसह येथे काम करणाऱ्या 20 जणांविरुद्ध राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. 

यामध्ये समीर अग्रवाल, अश्‍विन मित्तल, अविष्कार मेहोत्रा या संचालकांसह व्यवस्थापक व जीवनावश्‍यक वस्तूची ने आण करणारे वाहन चालक, मजूर यांची संपूर्ण माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. कारवाई करणाऱ्या पथकात महापालिकेचे डॉ. सचिन बोंद्रे यांच्यासह पोलिस कर्मचारी प्रमोद देशमुख, सतीश खंडारे, महापालिकेचे भूषण राठोड, अनिकेत सोनोने, आकाश ढवळे यांचा समावेश होता. 

ते तिघे बिनधास्त निघाले; पोलिसांनी कार थांबवली असता पुढे आला हा प्रकार...

ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
वॉलमार्टच्या प्रत्येक स्टोअरच्या प्रवेशद्वारावर हात धुण्याची व्यवस्था असून ठिकठिकाणी सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहेत. तापमान तपासण्यासाठी थर्मामीटरसुद्धा उपलब्ध आहेत. अधिकाधिक स्पर्श होणारी ठिकाणे सातत्याने स्वच्छ केली जातात आणि निर्जंतुक केली जातात. मास्क आणि ग्लोव्हज वापरावे याची खात्री आम्ही करत आहोत. कोरोना विषाणू विरोधातल्या लढ्यात याची मदत होईल. या काळात सुरक्षितरित्या आम्ही समाजाची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे वॉलमार्टच्या प्रवक्‍त्याने सांगितले.