Video : तुकाराम मुंढे साहेबऽऽ, दारूविक्रीला तुम्ही का विरोध करीत आहात...

Confusion about liquor shop in Nagpur
Confusion about liquor shop in Nagpur

नागपूर : देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सर्वाधिक रुग्ण मुंबई, पुणे, दिल्ली, मालेगाव, नागपूर आदी ठिकाणी आढळून आले आहेत. यामुळेच मुंबई, पुणे, नागपूर आदींना "रेड झोन'मध्ये टाकले आहेत. येथे दारू विक्रीला बंदी घातली आहे. असे असतानाही मुंबई आणि पुणे येथे दारूविक्री केली जात आहे. मात्र, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी दारूविक्रीस सक्‍त मनाई केली आहे. यामुळे दारूविक्रीला तुकाराम मुंढे यांचा विरोध का, असा प्रश्‍न तळीराम एकमेकांना विचारत आहेत. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन जाहीर झाले आहे. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र आणि राज्य सरकारने ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये शिथिलता जाहीर केली आहे. राज्य सरकारने रविवारी ग्रीन, ऑरेंज झोनसह कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सील केलेला परिसर (हॉटस्पॉट) वगळता रेड झोनमध्ये जीवनावश्‍यक वस्तूच्या दुकानांसोबत रस्त्याच्या एका बाजूला असलेली इतर पाच दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. यात दारूच्या दुकानांचाही समावेश आहे. परंतु, दारूची दुकाने उघडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या तळीरामांना महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलासा देण्याचे स्पष्टपणे नाकारले आहे.

राज्य सरकारचे आदेश प्रत्येकाकडेच पोहोचल्याने मद्यविक्रेत्यांमध्ये व्यवसाय सुरू होणार याबाबत चांगलीच चर्चा रंगली. एवढेच नव्हे अनेक मद्यप्रेमींपर्यंतही हे आदेश पोहोचल्याने त्यांनीही "एकच प्याला'ची स्वप्नेही रंगविली. परंतु, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रचिचसार सायंकाळी नागपूर रेड झोनमध्ये असल्याने येथे कुठलही शिथिलता राहणार नाही. दुसऱ्या टप्प्याप्रमाणे तिसऱ्या टप्प्यातही केवळ जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील, असे आदेश जारी केले. त्यामुळे मद्यप्रेमींसोबतच विक्रेत्यांतही संभ्रम निर्माण झाला. 

आज दारूची दुकाने सुरू न झाल्याने तळीरामांच्या चर्चेतून आयुक्‍त तुकाराम टार्गेटवर असल्याचे दिसून आले. तुकाराम मुंढे यांना दारूचे दुकान सुरू करण्यात काय हरकत आहे. अन्य ठिकाणी तर दुकान सुरू आहेत. मग हेच का विरोध करतात, अशी चर्चा तळीराम करीत असल्याचे पाहायला मिळाले.

तळीरामांची निराशा

सोमवारी दारूचे दुकान सुरू होणार की नाही, असाच प्रश्‍न तळीरामांच्या मनात उपस्थित होत होता. तरीही दारू मिळेल या आशेवर ते होते. दीड महिन्यांपासून दारूच प्यायला मिळत नसल्याने अनेकांमध्ये नाराची होती. तसेच काही जण जास्त पैसे देऊन दारूची ब्लॅकमध्ये खरेदी करीत होते. आज दारूची दुकाने उघडणार आणि दारू प्यायला मिळणार या सभ्रमात ते होते. मात्र, सोमवारी दारूची दुकाने सुरूच झाली नाही. त्यामुळे तळीरामांची मोठी निराशा झाली. 

मद्यविक्रेते संभ्रमात

राज्य सरकारने रविवारी ग्रीन, ऑरेंज झोनसह कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सील केलेला परिसर (हॉटस्पॉट) वगळता रेड झोनमध्ये जीवनावश्‍यक वस्तूच्या दुकानांसोबत रस्त्याच्या एका बाजूला असलेली इतर पाच दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. यात दारूच्या दुकानांचाही समावेश आहे. दुसरीकडे महापालिका आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी दारूव्रिकीस मनाई केली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे आदेश पाळायचे की महापालिकेचे? अशा संभ्रमात मद्यविक्रेते आहेत.

अमरावतीत तळीरामांचा जोश अन्‌ उत्साह

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता देशात सर्वत्र लॉकडाउन ठेवण्यात आला. तब्बल दीड महिन्याचा लॉकडाउननंतर सोमवारी दारूची दुकाने उघडणार, अशी घोषणा करण्यात आली अन्‌ तळीरामांमध्ये एकच उत्साह संचारला. सोमवारी सकाळपासूनच शहरातील दुकानांबाबत संभ्रमाची स्थिती होती. अनेक दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंगची व्यवस्था सुरू केल्याने मद्यपींना आणखी हुरूप आला. मात्र, आदेश अप्राप्त असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात येत असतानाही शहरातील जवळपास सर्वच वाइन शॉपसमोर मद्यपींची गर्दी उसळली होती. कोरोनामुळे मास्क तसेच दुपट्टे बांधले असल्याने अनेकजण बिनधास्तपणे दुकानांच्या परिसरात उभे असल्याचे चित्र दिसून आले. काही दुकानदारांनी त्यांच्या दुकानाच्या समोर बॅरिगेट्‌स लावून आपली तयारी पूर्ण केली होती. मात्र, प्रत्यक्षात दुकाने सुरू झाली नव्हती. 

सहकार्य करा 
नागपूर रेड झोनमध्ये असल्याने नागरिकांच्या आरोग्यासाठी काळजी घेणे आवश्‍यक आहे. नियम किती लवकर शिथिल करायचे ते आता नागरिकांनीच ठरवायचे आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनचे काटेकोर पालन करून शहरातील व्यवहार लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी सहकार्य करा. 
- तुकाराम मुंढे, 
आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com