काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

अकोला - साडेचार वर्षांत केंद्रातील व राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय; मात्र सरकार काहीच उपाययोजना करत नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांच्या हक्कांसाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस पक्षाने जनसंघर्ष यात्रा काढली आहे. या यात्रेच्या चौथ्या टप्प्याची सुरुवात झाली. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात निघालेल्या जनसंघर्ष यात्रेचा चाैथा टप्पा सुरू झाला आहे. यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातून प्रवास करीत ही संघर्ष यात्रा शुक्रवारी अकोला जिल्ह्यात पोहोचणार आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजता दोन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत अकोला शहरात स्वराज्य भवन येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे महानगराध्यक्ष बबनराव चाैधरी यांनी दिली. 

या दिग्गजांची राहणार हजेरी
जनसंघर्ष यात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, उपनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा चारुलता टोकस, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आमदार हर्षवर्धन सपकाळ, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यासह प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress jan sangharsh Yatra will be started