

Shocking Allegation Against Tehsildar in Washim
Esakal
राम वानखेडे : केनवड, ता. ८ : एकीकडे शासन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध योजना, मदतीचे पॅकेज आणि जनजागृती करत असताना दुसरीकडे अधिकारी शेतकऱ्यांना चक्क 'आत्महत्या करा' असा सल्ला देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार कृषिमंत्र्यांचे पालकत्व असलेल्या जिल्ह्यात घडल्याने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.