कोरोनाने डेकोरेशन, बॅंडपथकाचा व्यवसाय हिरावला...कारागिरांवर उपासमारीची वेळ

file photo
file photo

केशोरी (जि. गोंदिया) : कोरोनामुळे अनेक सामाजिक कार्यक्रमांना निर्बंध लागलेले आहेत. त्यामध्ये लग्नसोहळा हा महत्त्वाचा दुवा आहे. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाउन करण्यात आल्याने लग्नसोहळ्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे बॅंडपथक आणि डेकोरेशनवाल्यांचा रोजगार हिरावला आहे.

सरकारने लग्नसोहळ्यातील अटी शिथिल करून कारागिरांना काम मिळवून द्यावे, अशी मागणी बॅंडपथक, डेकोरेशनवाल्यांनी केली आहे.

15 हजारांची कमाई गेली

आर्थिक परिस्थितीमुळे मातंग, दलित, आदिवासी समाजातील अनेक तरुण आणि वृद्ध एकत्र येऊन बॅंडपथक आणि संदल वाजवण्याचे काम करायचे. जानेवारी ते जून महिन्यापर्यंत लग्नसराईची धामधूम असायची. या काळात एक बॅंडपथकाला 30-40 कार्यक्रम मिळायचे. दहा हजार रुपयांप्रमाणे 40 कार्यक्रम वाजवायचे आणि त्यांना या व्यवसायातून तीन लाख रुपये मिळायचे. प्रत्येकी दहा-पंधरा हजार वाटप करून हा समाज आपला उदरनिर्वाह करायचा.

आता कर्ज कसे फेडायचे

डेकोरेशनच्या व्यवसायामध्ये जास्त पैसा ओतावा लागतो. त्यासाठी त्यांना बॅंकेतून कर्जही काढावे लागते. एखाद्या कार्यक्रमाचे 20 हजारांपासून ते 40 हजारापर्यंत डेकोरेशनवाले घ्यायचे. त्यांच्या व्यवसाय लाखोंच्या घरात व्हायचा. परंतु आता कार्यक्रम नसल्यामुळे त्यांचा हा व्यवसाय ठप्प झालेला आहे. बॅंकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे आणि आपला उदरनिर्वाह कसा करायचा, याचीच चिंता बॅंडपथक, डेकोरेशनवाल्यांना सतावत आहे.

कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न
एका बॅंडपथकामध्ये 12 जण असतात. 30 ते 35 कार्यक्रम मिळाल्यानंतर दोन ते तीन लाख रुपयांच्या व्यवसाय होतो. यामुळे प्रत्येकाला 15 हजार रुपये मिळायचे. त्या पैशांमधून पावसाळ्यातील तीन महिन्यांच्या कालावधीत कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा. कोरोनामुळे आता उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.
- अरुण मस्के, बॅंडपथक वादक.

यावर्षी एकही कार्यक्रम मिळाला नाही
बॅंकेचे कर्ज घेऊन डेकोरेशनचा व्यवसाय उभा केला. एक चारचाकी वाहनही घेतले. परंतु या कोराना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी एकही कार्यक्रम न मिळाल्यामुळे बॅंकेचे कर्ज कसे फेडायचे व आपला उदरनिर्वाह कसा करायचा, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.
- श्रावण निनावे, डेकोरेशन व्यवसायिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com