गडचिरोलीत 12 कोविड नियंत्रण कक्षांकडून मदतीचा हात; रुग्णांची स्थिती ते तक्रारीपर्यंत माहिती

गडचिरोलीत 12 कोविड नियंत्रण कक्षांकडून मदतीचा हात; रुग्णांची स्थिती ते तक्रारीपर्यंत माहिती
PASIEKA

गडचिरोली : जिल्ह्यात जिल्हा मुख्यालयी 1 मुख्य नियंत्रण कक्ष व इतर 11 तालुक्‍यांत प्रत्येकी एक असे मिळून 12 कोविड नियंत्रण कक्ष (Covid control unit) स्थापन करण्यात आले आहेत. या सर्व नियंत्रण कक्षातून दैनंदिन स्वरूपात रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना चांगल्या प्रकारे सविस्तर माहिती व मदत मिळत आहे. (Corona control unit helping people in Gadchiroli)

गडचिरोलीत 12 कोविड नियंत्रण कक्षांकडून मदतीचा हात; रुग्णांची स्थिती ते तक्रारीपर्यंत माहिती
पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या; माजी मंत्री राजकुमार बडोले यांची मागणी

सध्या कोविड संसर्गामुळे सर्व स्तरावर धावपळ सुरू आहे. अशातच रुग्णांच्या नातेवाइकांना मदत मिळावी व गरजूला वेळेत उपचार किंवा बेड उपलब्ध व्हावेत म्हणून या नियंत्रण कक्षांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे. बहुतेक नातेवाइकांना रुग्णांना भेटता येत नाही अथवा त्यांना भेटणे संसर्गामुळे शक्‍य नसते. अशा वेळी रुग्णाची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी या कोविड नियंत्रण कक्षाची चांगली मदत होत आहे. सध्या लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृहविलगीकरणाचा पर्याय देण्यात येत आहे.

सर्व गृहविलगीकरणातील रुग्णांना आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली घरी ठेवण्यात आले आहे. अशा वेळी अचानक उद्‌भवणाऱ्या परिस्थितीत या कोविड नियंत्रण कक्षाची मदत होत आहे. अशा रुग्णांना दूरध्वनीद्वारे आवश्‍यक मदत दिली जाते. अथवा आपत्कालीन स्थिती असल्यास दवाखान्यात हलविण्यासाठी नियोजन केले जाते. 1 मे पासून आत्तापर्यंत जिल्हा मुख्यालयातील प्रमुख कोविड नियंत्रण कक्षामध्ये 307 नागरिकांनी संपर्क केला. तसेच नियंत्रण कक्षाकडून 1595 रुग्ण किंवा त्यांचे नातेवाइक यांना संपर्क करण्यात आला आहे. एप्रिलपासून कोरोना संसर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढला. रुग्णसंख्या वाढली तसे बेड कमी पडू लागले. त्यामुळे प्रशासनाकडून बेडची संख्याही वाढविण्यात आली. परंतु काही वेळा ऑक्‍सिजन बेडची कमतरता भासत आहे.

काही रुग्ण प्रतीक्षेत असतात. अशावेळी नेमके रुग्णाला कुठे ऍडमिट करायचे, कुठे बेड उपलब्ध आहे, याचे उत्तर या नियंत्रण कक्षाकडे मिळते. तसेच आरोग्य विभागाअंतर्गत सनियंत्रणासाठी सर्व रुग्णांची स्थिती संगणकावर अपडेट करत असतात. यातून कोणत्या रुग्णाला कोणत्या वॉर्डमध्ये ठेवायचे, हेही या नियंत्रण कक्षाच्या अहवालावरून समोर येते. यानंतर संबंधित डॉक्‍टर निर्णय घेतात. यातून बेडची उपलब्धता लक्षात येते.

जिल्ह्यातील कोविड दवाखान्यांमध्ये मिळणाऱ्या आरोग्य सुविधांबाबत काही तक्रारी असल्यास नागरिक येणाऱ्या अडचणी दिलेल्या संपर्क क्रमांकावर नोंदवू शकतात. बेड उपलब्धता, गृहविलगीकरणातील रुग्ण अशा विषयांबाबत वेगवेगळ्या प्रश्‍नांवर नागरिक या कोविड नियंत्रण कक्षाकडे संपर्क साधू शकतात. संबंधित नियंत्रण कक्ष आपली तक्रार नोंदवून तिचा पाठपुरावा करून तक्रारदाराला माहिती देतात. तसेच तक्रारी सोडविण्याबाबत संबंधित यंत्रणेला यातून सूचना दिल्या जातील, असेही कळविण्यात आले आहे.

या क्रमांकांवर साधा संपर्क....

कोरोनासंदर्भात किंवा आपल्या कोरोनाग्रस्त व उपचार सुरू असलेल्या रुग्णाच्या स्थितीविषयी माहिती हवी असल्यास जिल्हा कोविड नियंत्रण कक्ष, गडचिरोली - 07132 222031, 07132 222030, 07132 222035, धानोरा - 9359408123, आरमोरी - 9405202079, वडसा - 07137 272400, कुरखेडा - 07139 245199, चामोर्शी - 8275913107, कोरची - 8275932599, मुलचेरा - 07135 271033, 8275879981, अहेरी - 07133 295001, एटापल्ली - 07136 295210, भामरागड - 07134 220039, सिरोंचा - 07131 233129 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

गडचिरोलीत 12 कोविड नियंत्रण कक्षांकडून मदतीचा हात; रुग्णांची स्थिती ते तक्रारीपर्यंत माहिती
लॉकडाउन उठणार शेतकऱ्यांच्या जीवावर; 'हे' काम करणं आवश्यक; अन्यथा...
गृह विलगीकरणातील रुग्णांना येणाऱ्या अडचणी सोडविणे, त्यांच्या नातेवाइकांना रुग्णसेवेबाबतची मदत करणे, ग्रामीण भागातून रुग्णांना जिल्ह्याला भरती करताना बेडची उपलब्धता तपासणे व विविध तक्रारींचे निराकरण करणे हे या कोविड नियंत्रण कक्षाचे कार्य आहे. सद्य:स्थितीत या कोविड नियंत्रण कक्षांतून गरजूंना चांगल्या प्रकारे मदत दिली जात आहे.
- डॉ. विनोद मशाखेत्री, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली

(Corona control unit helping people in Gadchiroli)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com