लॉकडाउन उठणार शेतकऱ्यांच्या जीवावर; 'हे' काम करणं आवश्यक; अन्यथा...

लॉकडाउन उठणार शेतकऱ्यांच्या जीवावर; 'हे' काम करणं आवश्यक; अन्यथा...
Updated on

पारशिवनी (जि. नागपूर) : पारंपरिक शेती (Traditional farming) शास्त्रीय आधारावर अवलंबून असून त्यानुसार शेतकरी उन्हाळ्यात शेतीची मशागत ( Cultivation of agriculture) करुन खरीप हंगामात (Kharif season) शेती करतो. त्यावर परिवाराचे पालनपोषण होते. यावेळी लॉकडाउनमुळे शेतीच्या मशागतीच्या कामात अडचण निर्माण होत असल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी वर्तवित आहे. हा धोका पाहता ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडून जाण्याची शक्यता कंरभाड येथील प्रगतिशील शेतकरी खेमराज दरणे तसेच प्रमोद भक्ते यांनी व्यक्त केली आहे. (Farmers are in trouble due to lockdown in Nagpur)

लॉकडाउन उठणार शेतकऱ्यांच्या जीवावर; 'हे' काम करणं आवश्यक; अन्यथा...
लक्षात ठेवा! आता २५ नव्हे तर अवघ्या १५ जणांनाच परवानगी; लग्नसमारंभांवर पुन्हा संक्रांत

पावसाच्या पाण्यावर आधारित पिके खरीप हंगामात घेतली जातात. त्यासाठी ८ जूनपूर्वी शेतीची मशागत करणे अत्यावश्यक असते. निसर्गाचा नेम नसल्याने पावसाळा सुरु होण्याआधी शेतीची मशागत टाळेबंदीमुळे झाली नाही, तर खरीप हंगामात पेरणी होणे अशक्यप्राय झाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती निर्माण होत आहे. कापूस, सोयाबीन, बाजरा, ज्वारी, मका व इतर पिके खरीप हंगामात घेतली जातात. त्याकरिता शेतीची मशागत आधीच करणे आवश्यक असते.

८ जूनपासून खरीप हंगामाला सुरवात होणार आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था याच हंगामावर अंवलबून असते. यावर्षी ८ जूनपासून मृग नक्षत्राला सुरवात होणार आहे. २१ जूनपासून आर्द्रा नक्षत्रासह पेरणीच्या कामाची वेळ असते. टाळेबंदीमुळे सर्वकाही ठप्प झाले असून शेतीकरीता लागणारी साधनेही दुकाने बंद असल्याने ती वेळेवर विकत घेता येत नाही.

मे महिना हा शेती मशागतीकरीता महत्वपूर्ण असून या काळात पूर्णतः लॉकडाउनचे कुंपण घातले गेले आहे. त्यामुळे दुकाने बंद असून खरेदी करायची कशी? जर हीच परिस्थिती कायम राहिली तर मात्र शेती मशागतींची कामे अपुरी राहतील व खरीप हंगाम पूर्णपणे वाया जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांवर यंदाही उपासमारीची वेळ येईल, असे मत प्रगतिशील शेतकरी हेमराज दरणे, प्रमोद भक्ते यांनी वर्तविले आहे.

लॉकडाउन उठणार शेतकऱ्यांच्या जीवावर; 'हे' काम करणं आवश्यक; अन्यथा...
ग्रामीण भागातील महिलांचा गृहसजावटीवर भर; आरोग्यवर्धक रोपट्यांना महत्व
कोरोना संक्रमण व मृत्यूची गती पाहता लॉकडाउन करण्यात आले, ते योग्यच आहे. पण येणारा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी जिवन मरणाचा काळ असतो. त्या काळात जर शेतकरी शेती करु शकला नाही, तर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्णतः डबधाईस येईल. शेती पिकली नाही तर शेतकऱ्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ येईल. त्यासाठी शेती साहित्याची व शेतकऱ्यांना लागणारी शेतीपयोगी वस्तूंची दुकाने नियमित सुरु ठेवणे गरजेचे आहे.
-नरेश भेदरे

(Farmers are in trouble due to lockdown in Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com