esakal | शाळा सुरु झाली अन् घात झाला; विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; वाढतोय कोरोनाचा प्रादुर्भाव  
sakal

बोलून बातमी शोधा

Corona is increasing after starting of Schools Latest News

विद्यार्थ्यांना झालेल्या या कोरोना संसर्गाची दखल घेत शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांनी तालुक्‍यातील या शाळांना भेटी देऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. शाळा सॅनिटाइज करणे, शाळा एक आठवडा बंद ठेवणे, शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करून घेणे,

शाळा सुरु झाली अन् घात झाला; विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; वाढतोय कोरोनाचा प्रादुर्भाव  

sakal_logo
By
मिलिंद उमरे

कोरची (जि. गडचिरोली) : एकीकडे अनलॉक प्रक्रिया राबवीत राज्य सरकारने नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू केल्या असताना काही ठिकाणी विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. कोरची तालुक्‍यातील चार शाळांमधील 19 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय शाळेतीलच एका कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने येथील एकूण संख्या 20 झाली आहे.

तालुक्‍यातील चार विद्यालयांतील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी 4 जानेवारी रोजी करण्यात आली होती. त्याची रिपोर्ट 11 जानेवारी रोजी आली होती. त्यात 13 विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आढळून आल्या होती. त्यानंतर त्याच दिवशी पारबताबाई विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात पुन्हा 6 विद्यार्थी आणि 1 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने कोरची तालुक्‍यातील शिक्षण क्षेत्रात व पालक वर्गात भीती निर्माण झाली आहे. 

अधिक वाचा -  पानिपतावर जिंकण्यासाठी नव्हे तर तत्वासाठी लढले मराठे; पहिल्यांदाच उघड झालीत धारातीर्थी पडलेल्या सरदारांची नावं 

विद्यार्थ्यांना झालेल्या या कोरोना संसर्गाची दखल घेत शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांनी तालुक्‍यातील या शाळांना भेटी देऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. शाळा सॅनिटाइज करणे, शाळा एक आठवडा बंद ठेवणे, शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करून घेणे, शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे आदी सूचना त्यांनी दिल्या. यावेळी गटशिक्षणाधिकारी आबाजी आत्राम, मुख्याध्यापक शालीकराम कराडे उपस्थित होते. 

याविषयी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मडावी यांना विचारले असता, शाळा सॅनिटाइजर करण्यास आणि आठ दिवस बंद ठेवण्यास सांगितल्याचे ते म्हणाले. पण मुख्याध्यापक शालीकराम कराडे यांना विचारले असता डॉ. मडावी यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची सूचना दिली नाही. शिवाय ते कधीही शाळेत आले नाही, असे सांगितले. 

जाणून घ्या - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून 4 जानेवारी रोजी टेस्ट करून घेतली. पण त्याची रिपोर्ट चक्क सात दिवसांनंतर मिळाली. या सात दिवसांत हे विद्यार्थी ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आले त्यांनाही लागण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही चाचणी कमी वेळात करण्यासाठी मी जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन, असे आश्‍वासन शिक्षणाधिकारी निकम यांनी दिले.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image