esakal | बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली
sakal

बोलून बातमी शोधा

two youth committed suicide in nagpur

सकाळी आठ वाजता बहिण सोनाली त्याच्या खोलीकडे गेली. तिने भावाला आवाज दिला. मात्र,त्याने प्रतिसाद दिला नाही.

बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : मानसिक तणाव सहन न करू शकल्याने दोन तरुणांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. एकाने नोकरी न मिळाल्याने, तर दुसऱ्याने मानसिकरित्या खचल्यामुळे आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

हेही वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज यशवंत बोरकर (२१, रा.बजाज अपार्टमेंट, त्रिमूर्तीनगर) याने मंगळवारी सकाळी आपल्या खोलीमध्ये सिलींग फॅनला ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी आठ वाजता बहिण सोनाली त्याच्या खोलीकडे गेली. तिने भावाला आवाज दिला. मात्र,त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिने खिडकीतून बघितले असता सूरज गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ती मोठ्याने किंचाळली. सूरजला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्रतापनगर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. सूरजचे वडील यशवंत हे नागभीड पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. व्हॉट्सअ‌ॅपवरील काही मेसेजवरून सूरज तणावात होता, अशी माहिती मिळाली. 

हेही वाचा - लग्नानंतरच दीड वर्षात झाले पतीचे निधन, तरीही खिचडी शिजविली तिथेच गाठले नगराध्यक्षपद

स्वप्नील काशिराम करूडकर (२४, रा.रामकृष्णनगर, वाठोडा लेआऊट) हा पदवीधर होता. गेल्या तीन वर्षांपासून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. त्याने काही ठिकाणी नोकरीसाठी मुलाखती दिल्या होत्या. परंतु, त्याच्या पदरी निराशा आली. त्यामुळे तो तणावात होता. स्वप्नीलच्या वडीलाचे २०१६ ला निधन झाले, तर भाऊ नागपूर पोलिसांत कार्यरत आहे. सोमवारी रात्री स्वप्नीलने घरात सिलिंग फॅनला दोरी बांधून गळफास घेतला. मंगळवारी सकाळी नऊ वाजता तो चहा घ्यायला घरी न आल्यामुळे खोलीमध्ये डोकावले असता हा प्रकार उघडकीस आला. स्वप्नीलने सुसाईड नोट लिहिली असून 'जीवनात निराश झालो आहे. कठोर मेहनत केल्यानंतरही मला नोकरी मिळाली नाही. त्यामुळे मी खचलो आहे.' असा उल्लेख केला आहे. 
 

go to top