कोरोना ब्रेकिंग : यवतमाळात एकाचा मृत्यू, एकाच दिवशी 16 पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

मंगळवारी नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 16 जणांमध्ये 12 जण यवतमाळ शहरातील असून, दोन जण पुसद येथील आणि दोन जण नेर येथील आहेत.

यवतमाळ : जिल्ह्यात आज (दि.7) एकाच दिवशी 16 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने ऍक्‍टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 86 वर पोहचली. तर यवतमाळ शहरातील 52 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याने मृत्यूचा आकडा एकाने वाढून 13 झाला आहे. 

मंगळवारी नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 16 जणांमध्ये 12 जण यवतमाळ शहरातील असून, दोन जण पुसद येथील आणि दोन जण नेर येथील आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील सात पुरुष व पाच महिला, पुसद येथील दोन पुरुष आणि नेर येथील दोन महिलांचा समावेश आहे.

Video : प्रसूतीनंतर ती वारंवार म्हणत होती 'मी मरेन, मी मरेन', तरीही कुणी लक्ष दिले नाही...
 

सहा जुलैपर्यंत जिल्ह्यात ऍक्‍टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 71 होती. एका महिलेचा मंगळवारी मृत्यू झाल्याने ही संख्या 70 वर आली. मात्र, नव्याने 16 जण पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात ऍक्‍टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 86 झाली. सद्य:स्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 110 जण भरती आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 345 वर पोहचला आहे. यापैकी 246 जण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यात 13 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने मंगळवारी 47 नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविले.

सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 6201 नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून, यापैकी 5795 प्राप्त तर 406 रिपोर्ट अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5450 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona : one died in Yavatmal, 16 positive in a day