निष्काळजीपणाचा कळस! पती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही नेले घरी; दुसऱ्या दिवशी मृत्यू होताच पत्नीविरुद्ध गुन्हा

Corona patient died and files charges against wife in Bhandara
Corona patient died and files charges against wife in Bhandara

लाखांदूर (जि. भंडारा) : कोविड-१९ तपासणीत रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भंडारा येथे हलविण्याचे सांगितले. मात्र, कुटुंबीयांनी हयगय व निष्काळजीपणा करीत रुग्णाला परस्पर घरी घेऊन गेले. काही दिवसांनी घरी रुग्णाचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिक्षकांच्या तक्रारीवरून मृत इसमाच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी विष्णू गुरनूले यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांची चाचणी लाखांदूर येथील कोविड केअर केंद्रात करण्यात आली होती. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुरनूले यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील सामान्य रुग्णालयात हलविले होते.

मात्र, कुटुंबीयांनी गुरनूले यांना भंडारा येथे घेऊन जान्याऐवजी घरी घेऊन गेले होते. घरी उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यामुळे शासन-प्रशासन स्तरावर एकच खळबळ उडाली होती. तसेच परिसरात कोरोना पसरण्याचा धोका वाढला. दोन ऑक्टोबर रोजी येथील वैद्यकीय अधिक्षकांच्या तक्रारीवरून रुग्णाप्रती हयगय व निष्काळजी पणाचे कृत्य केल्याप्रकरणी लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नीलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस नाईक विलास मातेरे व पोलिस कर्मचारी पप्पू कठाणे करीत आहेत.

हयगय, निष्काळजी पणा केल्याप्रकरणी गुन्हा

ही घटना लाखांदूर येथे २८ सप्टेंबरला दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास घडली. वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनील रंगारी यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये मृताची पत्नी वैशाली विष्णू गुरनुले (४५, रा. लाखांदूर) यांच्याविरुद्घ गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

लोकांमधील निष्काळजी कायम

कोरोना विषाणू दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. रोज बाधित आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. मात्र, याचा सामान्या लोकांवर कोणताही परिणाम होत नसल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे. लोकांच्या निष्काळजीपणाचा फटका मात्र प्रशासनाला बसता आहे. वेळीच यावर आळा नाही घातल्यात परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com