या जिल्ह्यातील पॉझिटिव्ह महिला रुग्ण 14 दिवसानंतर "निगेटिव्ह'...आता तिसऱ्या अहवालाकडे लक्ष

file photo
file photo

भंडारा : ग्रीन झोन असलेल्या भंडारा जिल्ह्यात 27 एप्रिलला एक कोरोनाबाधित महिला आढळून आल्याने जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेला होता. आता मात्र या रुग्ण महिलेचा 14 दिवसानंतर अहवाल निगेटिव्ह आला आहे. ही भंडारा जिल्ह्यासाठी आनंदाची बाब आहे. तिसऱ्या अहवालानंतरच जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल होणार आहे.

गराडा येथील महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. या अहवालानंतर प्रशासनाने खबरदारी घेत गराडा परिसरातील गावे सील केले. तसेच महिलेच्या संपर्कातील सर्वांना क्वारंटाइन करून त्यांच्या घशाचे नमुने पाठविण्यात आले होते. मात्र, महिलेच्या संपर्कातील सर्वांचे नमुने निगेटिव्ह आल्यानंतर जिल्हावासींनी सुटकेचा निःश्वास सोडला होता.

तिसरा नमुना पाठविण्यात आला

दरम्यान, 14 दिवसांनंतर शुक्रवारी (ता. 8) या रुग्ण महिलेचा पहिला नमुना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आला. नमुन्याचा अहवाल शनिवारी (ता. 9) रात्री उशिरा निगेटिव्ह प्राप्त झाला. यानंतर तिसरा नमुना पाठविण्यात आला आहे. या नमुन्याचा अहवाल सोमवारपर्यंत अपेक्षित आहे. त्यामुळे जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असली; तरी तिसऱ्या नमुन्याच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महिलेला लागण कशी झाली हे अजूनही गुपित

कोरोनाबाधित महिलेला क्षयरोग असल्याने ती उपचारासाठी नागपूर येथून गराडा येथे माहेरी आली होती. मागील दोन महिन्यांपासून ती गराडा येथेच होती. या महिलेला कोरोनाची लागण कशी झाली, हे मात्र अजूनही गुपितच आहे. कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील सर्वांचे नमुने निगेटिव्ह आले. यामुळे कोरोनाबाधित महिलेचा वाहक कोण? हे मात्र अजूनही स्पष्ट झाले नाही. महिला कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने तिला कोरोना झाला असेल, हे तितकेच खरे असले; तरी त्याच्यापर्यंत प्रशासन पोहचू शकले नाही. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आतापर्यंत 569 नमुने निगेटिव्ह

आरोग्यविभागाकडून कोरोना प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवीत आहे. आतापर्यंत 606 नमुन्यांपैकी एक पॉझिटिव्ह वगळता 569 नमुने निगेटिव्ह आले आहेत. 36 नमुन्यांचा अहवाल मात्र अप्राप्त आहे. जिल्ह्यात सध्या आयसोलेशन वॉर्डात 20 व्यक्ती भरती आहेत. आतापर्यंत येथून 189 जणांना सुटी देण्यात आली. रविवारी नर्सिंग हॉस्टेल भंडारा येथे 17 व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले. तसेच साकोली, तुमसर व मोहाडी तालुक्‍यातील कोविड केअर सेंटरमध्ये 22 व्यक्ती भरती आहेत. असे एकूण 39 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आतापर्यंत 392 व्यक्तींना येथून सुटी देण्यात आली. आतापर्यंत पुणे, मुंबई व इतर राज्यातून दाखल झालेल्यांची संख्या 28,544 आहे. 20,728 व्यक्तींचा 28 दिवसांचा होमक्वारंटाइन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच 7,818 व्यक्ती होमक्वारंटाइन आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com