विदर्भात कोरोनाने वाढविली धाकधूक; दोनशेंवर रुग्णांचा झाला मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

म्हणजे जिल्ह्यातील १४ तालुक्‍यातील एकही तालुका कोरोनाची लागण होण्यापासून दूर राहू शकला नाही. जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा आता उघडल्या असल्याने सर्वत्र गर्दी दिसून येत असून त्यातून संसर्ग वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

नागपूर ः कोरोनामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. अनेकांचे रोजगार गेले आहे. विदर्भात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. अमरावती सारख्या शहरात २ हजार ७०१ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. हा आकडा  वाढतच असून लोकांमध्यचे धाकधूक वाढतच आहे. आज विदर्भात 839  रुग्ण आढळले आहेत. तर 26 जणांचा मृत्यू झाला आहे. 

अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत असून येथील काही लोकप्रतिनिधींसह आत्तापर्यंत २ हजार ७६४ जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. मृतांचा आकडा सुद्धा दिवसेंदिवस वाढत असून तब्बल ८० जणांना आपले प्राण गमवावे लागले. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी दर शनिवारी तसेच रविवारी जनता कर्फ्यू पुकारण्यात येत असला तरी रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढच होत आहे. 
दरम्यान, तातडीने अहवाल यावेत यासाठी रॅपिड ऍण्टिजन टेस्ट सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचा अहवाल तातडीने मिळत असल्याने रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्‍य होत आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे उपचार झाल्यावर बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या एक हजार ८६० च्या घरात आहे. बुधवारी (ता.5) रात्री आलेल्या अहवालात दाखल असलेल्या रुग्णांची संख्या ७५२ होती. यातील १५ जण नागपूरच्या रुग्णालयात दाखल आहेत. आज जिल्ह्यात ९२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे जिल्ह्यातील १४ तालुक्‍यातील एकही तालुका कोरोनाची लागण होण्यापासून दूर राहू शकला नाही. जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा आता उघडल्या असल्याने सर्वत्र गर्दी दिसून येत असून त्यातून संसर्ग वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

 

हे वाचा— सरकारी कार्यालयातच मिळत नाही साक्षीदार, वाचा संपूर्ण प्रकार 

 

भंडारा जिल्ह्यात २४ नवे रुग्ण आढळले तर क्रियाशील रुग्ण १०३ आहेत. आज चार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्‍यातील २१, लाखनी एक व मोहाडी तालुक्‍यातील दोघांचा समावेश आहे. आत्तापर्यंत २३१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या ३२४ झाली असून १०३ क्रियाशील रुग्ण तर, सहा  रुग्ण आहेत. आत्तापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या दोन आहे. सध्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ११७ व्यक्ती भरती असून ७९१ व्यक्तींना आयसोलेशन वॉर्डमधून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत १९७५ व्यक्तींची अँटिजेन तपासणी केली असून त्यात ३४ व्यक्ती पॉझिटिव्ह तर, १९४१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

चंद्रपूरमध्ये २४ तासात ६७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. आत्तापर्यंत एकूण बाधितांची संख्या ७४९ आहे. तर ४२६ रुग्ण बरे झाले  तसेच ३२१ बाधितांवर उपचार सुरू आहे.  ब्रम्हपुरी तालुक्यातून २८ बाधित आले पुढे आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज सर्वाधिक बाधित हे ब्रह्मपुरी तालुक्यातील आहे. बहुतेक बाधित हे १९ ते ४० वयोगटातील असून परस्परांच्या संपर्कातून पुढे आले आहेत. ३२१ बाधितांवर सध्या जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. ४२६ बाधित जिल्ह्यात आत्तापर्यंत बरे झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ४६ जण नव्याने पॉझिटिव्ह आले. तर एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. तसेच प्रकृतीत सुधारणा झाल्याने ८२ जणांना सुटी  देण्यात आली. जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधित रुग्णांना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केल्यामुळे सध्यास्थितीत जिल्ह्यात ऍक्‍टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३२३ इतकी आहे. जिल्ह्यात सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक हजार ३५६ झाली आहे. त्यापैकी ९९४ जण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 

आत्तापर्यंत ३७ जणांच्या मृत्यूची नोंद
जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ३७ जणांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्यास्थितीत आयसोलेशन वॉर्डात १२५ जण भरती आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज शुक्रवारी ६३ नमुने तपासणीकरिता पाठविले. सुरुवातीपासून आत्तापर्यंत २३ हजार ५० नमुने पाठविले आहेत. त्यापैकी १९ हजार ५० प्राप्त व चार हजार नुमने अप्राप्त आहेत. १७ हजार ६९४ नागरिकांचे नमुने आत्तापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.  

अकोला जिल्ह्यात आज ५५ कोरोना बाधित आढळले. तर १८ रुग्ण  कोरोनामुक्त झाले. ४६३ रुग्ण सध्या सक्रीय ४६३ आहेत. आत्तापर्यंत ११३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण बाधित २ हजार ८८० आहेत.

-संपादन ः चंद्रशेखर महाजन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona raises fears in Vidarbha; Two hundred patients died