भयंकर! कोरोना रुग्ण तब्बल ५१ तास होता डॉक्टरांच्या संपर्कात, मग...

corona suspected patient in doctos contact
corona suspected patient in doctos contact

पुसद : येथील उपजिल्हा रुग्णालयातील कक्ष क्रमांक 36 मध्ये कोरोना बाधित रुग्णाचा तब्बल 51 तास डॉक्‍टर, कर्मचारी संपर्कात आले. त्यामुळे सर्वांनी होम अथवा संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात यावे, अशी मागणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे केली आहे. तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.

हुडी येथील एक संशयित रुग्ण तपासणीसाठी आला असता रुग्ण मुंबई येथील कोरोना बाधित परिसरातून आला असल्याने व त्याला ताप, खोकल्याची लक्षणे असल्याने उपजिल्हा उपजिल्हा रुग्णालयात भरती करू नये, असे डॉ. जय नाईक यांनी सुचविले. मात्र, वैद्यकीय अधीक्षक यांच्या आदेशावरून त्याला रुग्णालयातील कक्ष 36 मध्ये हलविण्यास सांगितले. हा रुग्ण 15 पासून 17 मेपर्यंत याच कक्षात औषधोपचार घेत होता.

त्याची पत्नी ही त्या वेळी रुग्णालय परिसरात कर्मचारी व इतरांच्या संपर्कात आली. त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे 51 तास कोरोना बाधित व्यक्ती रुग्णाच्या संपर्कात आलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांचे धाबे दणाणले. भरीसभर या रुग्णाची पत्नी व या कुटुंबाला उपजिल्हा रुग्णालयात पोचविणारा ऑटो चालकही पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे या कोरोना बाधितांच्या संपर्कात किती व्यक्ती आल्यात? त्या सर्वांना क्वांरनटाईन करण्याची कारवाई प्रशासनाला करावी लागत आहे. दोन दिवस होऊनसुद्धा या पत्राची वैद्यकीय अधीक्षकांनी दखल न घेतल्याने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी चिंतेत पडले आहेत.

उमरी येथील दोघे आयसोलेशनमध्ये दाखल

वणी : तालुक्‍यातील उमरी येथील मूळ रहिवासी असलेला परिवार मुंबईहून गावात आले. त्यांना लगेच शाळेत क्वारंटाइन करण्यात आले असता, यातील दोन महिलांची प्रकृती खालावल्याने आरोग्य विभागाने त्यांची रवानगी पांढरकवडा येथील आयसोलेशन वॉर्डात केली. उमरी या गावातील एक परिवार उदरनिर्वाहाकरिता मुंबईला गेला होता. हाताला काम नसल्याने मजूर गावी मंगळवारी (ता.19) परत आले.
गावकऱ्यांनी खबरदारी म्हणून त्या परिवाराला जिल्हा परिषद शाळेत राहण्याची व्यवस्था केली. मात्र यातील दोन महिलांची प्रकृती खालावल्याने आरोग्य यंत्रणेला माहिती देण्यात आली. या दोन्ही महिलांना पांढरकवडा येथील आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले. पाच वर्षीय बालिका व एका व्यक्तीला परसोडा येथे क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com