आता अमरावतीच्या प्रयोगशाळेतही होते कोरोनाची चाचणी

Corona test is now in Amarawati also
Corona test is now in Amarawati also
Updated on

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात स्थापण्यात आलेल्या कोरोना निदान प्रयोगशाळेत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडून (एम्स्‌) नमुने तपासणीसाठी पाठविण्यास सुरुवात झालेली आहे. विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत तपासलेल्या नमुन्यांची खात्री एम्सकडून केली जाते. हा सराव आणखी दोन-तीन दिवस चालण्याची शक्‍यता आहे.

राज्यात नांदेडनंतर अमरावती विद्यापीठात कोरोना निदान प्रयोगशाळेचा प्रस्ताव आयसीएमआरला देण्यात आलेला आहे. नांदेड येथे नमुने तपासण्यास सुरुवात झाली, तर अमरावती विद्यापीठातील प्रयोगशाळेचे समन्वयक डॉ. प्रशांत ठाकरे, डॉ. निरज घनवटे, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. अर्चना निकम, निलू सोनी आणि प्रज्ञा साऊरकर या पाच जणांनी नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स्‌) गत आठवड्यात प्रशिक्षण पूर्ण केले.

भारतीय मेडिकल कौन्सिल आणि रिसर्चची मान्यता मिळाल्यानंतर कोरोना निदान प्रयोगशाळा सुरू केली जाते. त्यादृष्टीने विद्यापीठात नमुने तपासले जात आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात रियल टाईम पॉलीमरेज चेन रिऍक्‍शनचे (आरटीपीसीआर) एक युनिट बसविण्यात आलेले आहे. त्यात एकावेळी 24 नमुने दीड तास ठेवले जातात. तत्पूर्वी, तब्बल पाच आवेष्टनात आलेल्या नमुन्यांची तीन तास प्रक्रिया केली जाते. प्रयोगशाळेत सर्व खबरदारी घेऊन सॅम्पल उघडल्यानंतर त्यातील व्हायरस मारला जातो. त्यानंतर त्याला आरटीपीसीआरमध्ये ठेवले जाते. हाती आलेल्या नमुन्यातील आरएनए तपासून त्याचे इंटरपिटीशन केले जाते. विश्‍लेषणाअंती सर्वसाधारणपणे सहा ते सात तासानंतर नमुन्याचा निष्कर्ष काढला जातो, अशी तज्ज्ञांची माहिती आहे. एम्सकडून आतापर्यंत किती नमुने तपासणीसाठी आले ते गोपनियतेच्या कारणास्तव उघड करण्याचे सूत्रांनी टाळले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील प्रयोगशाळेच्या रचनेच्या चित्रफितीची भारतीय मेडिकल कौन्सिल ऍण्ड रिसर्चने (आयसीएमआर) प्रशंसा केली आहे. आयसीएमआरने त्याबाबत समाधान व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आठ तज्ज्ञ नमुने तपासणीच्या प्रमुख भूमिकेत असून उर्वरित सहा ते सात कर्मचारी सहायक कामासाठी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com