esakal | बाप रे... अकोल्यात अकराशे प्रवाशी क्वारंटाईन!
sakal

बोलून बातमी शोधा

corona quarantine akola.jpg

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत बाहेरील जिल्ह्यातून परतलेल्या 21 हजार 446 प्रवाशांपैकी 1 हजार 153 प्रवाशांना अकोला जिल्ह्यात क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर 20 हजार 293 प्रवाशांनी कोरोना संसर्गाचा कालावधी पूर्ण केल्यामुळे त्यांना कोरोनाचा धोका काही प्रमाणात ओलांडला आहे. 

बाप रे... अकोल्यात अकराशे प्रवाशी क्वारंटाईन!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत बाहेरील जिल्ह्यातून परतलेल्या 21 हजार 446 प्रवाशांपैकी 1 हजार 153 प्रवाशांना अकोला जिल्ह्यात क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर 20 हजार 293 प्रवाशांनी कोरोना संसर्गाचा कालावधी पूर्ण केल्यामुळे त्यांना कोरोनाचा धोका काही प्रमाणात ओलांडला आहे. 

कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीमुळे मुंबई, पुणे, नागपूर यासह इतर जिल्ह्यातून व परप्रांतातून नागरिक जिल्ह्यात परतले आहेत. संबंधित नागरिक शिक्षणासह उदरनिर्वाह किंवा नोकरीसाठी इतर ठिकाणी गेले होते, परंतु संबंधित नागरिक ज्या गावातून जिल्ह्यात दाखल झाले, त्या ठिकाणी कोरोना विषाणूने अनेक नागरिकांना आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यामुळे अशा नागरिकांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच इतर नागरिकांना सुद्धा त्यांच्यापासून संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्याची मोहीम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत रविवारपर्यंत (ता. 3) जिल्ह्यात परतलेल्या 21 हजार 446 प्रवाशांची जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली आहे. संबंधितांपैकी 229 नागरिकांना पुढील तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संदर्भीत सुद्धा करण्यात आले. परतलेल्या प्रवाशांपैकी 20 हजार 293 नागरिकांनी क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. परंतु अद्याप 1 हजार 153 नागरिक क्वारंटाईन आहेत. 

क्वारंटाईनमध्ये असलेले प्रवाशी
अकोला तालुक्यातील 147, मूर्तिजापूर 302, बार्शीटाकळी 339, पातूर 60, बाळापूर 38, तेल्हारा 83, अकोट 184 असे एकूण 1 हजार 153 प्रवाशी क्वारंटाईन आहेत. 

loading image