पोलिसांनी केली घोषणा आणि गावकऱ्यांचे धाबे दणाणले

gondpimpari
gondpimpari
Updated on

गोंडपिपरी(जि. चंद्रपूर) : गावात बाहेरून आलेली एक व्यक्‍ती संशयित कोरोना रूग्ण असल्याची घोषणा पोलिसांनी केली. अन बघता बघता संपुर्ण परिसरात एकच खळबळ माजली. पोलिसांनी संपूर्ण गाव लॉकडाऊन केले. जवळपासच्या आठ गावात हाय अलर्ट जारी करण्यात आला. रुग्णवाहिकेतून संशयित रूग्णाला रूग्णालयात नेण्यात आले. जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रूग्ण नसतांना अचानक असा प्रकार झाल्याने संपूर्ण जिल्हयात चर्चा सुरू झाली. नंतर स्पष्ट झाले की ही पोलिसांची मॉकड्रिल होती आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
कोरोनाने हाहाकार माजविला आहे. हा आजार रोखण्यासाठी शासन प्रशासन जीवाचे रान करीत आहे. चंद्रपूरात अद्याप एकही कोरोनाचा रूग्ण आढळून आलेला नाही. अशातच आज गोंडपिपरी तालुक्‍यातील विठ्ठलवाडा गावात एक संशयित रूग्ण आढळून आल्याची घोषणा करण्यात आली आणि बघता बघता ही बातमी चौफेर वा-यासारखी पसरली. विठ्ठलवाडा गाव पूर्ण सिल करण्यात आले. गावात कुणी येऊ नये यासाठी गावाच्या सीमेवर पोलिस गस्त सुरू झाली. लगतच्या आठ गावांत हाय अलर्ट लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. डॉक्‍टरांनी संशयित रुग्णाची तपासणी केली. यानंतर विठ्ठलवाडयाच्या आरोग्य केंद्रातून संशयित रुग्णाला पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. बघता बघता ही बातमी संपूर्ण जिल्हाभर पसरली यानंतर पोलिसांनी स्पष्ट केले की ही मॉकड्रिल होती. चंद्रपूर जिल्हयात अदयाप एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार व पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेडडी हे यापुर्वी वैद्यकीय क्षेत्रात होते. यांचा मोठा फायदा होत असून ते प्रभावी नियोजन करीत आहेत. लोकांना आपल्या घरीच सुरक्षित राहण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आज गोंडपिपरी पोलिसांनी विठ्ठलवाडयात मॉकड्रिल करीत अनेकांना चांगलाच धक्का दिला. सोबत सतर्कतेचे आवाहन देखील केले.

सतर्क व सुरक्षित राहण्याचा संदेश
गोंडपिपरी पोलिसांच्या वतीने आज विठ्ठलवाडयात मॉकड्रिल करण्यात आली.यातून कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांना सतर्क व सुरक्षित रहाण्याचा संदेश देण्यात आला.
संदीप धोबे, ठाणेदार गोंडपिपरी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com