esakal | द्या टाळी... गडचिरोलीत होत आहेत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने बरे! 
sakal

बोलून बातमी शोधा

gadchiroli

ही दिलासादायक बाब असताना गडचिरोली शहरात एका रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नागरिकांत एकच खळबळ माजली आहे. 

द्या टाळी... गडचिरोलीत होत आहेत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने बरे! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : मुंबई येथून आलेल्या प्रवाशांमुळे प्रशासनावरचा वाढलेला ताण आता कमी होत आहे. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या झपाट्‌याने वाढली आहे. गुरुवारी (ता.4) जिल्हा सामान्य रुग्णालयातून 7 कोरोनाबाधितांना सुट्टी देण्यात आली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत टाळ्‌यांच्या गजरात त्यांना निरोप देण्यात आला. घरी सोडण्यात आलेले सातही जण एटापल्ली तालुक्‍यातील आहेत. ही दिलासादायक बाब असताना गडचिरोली शहरात एका रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नागरिकांत एकच खळबळ माजली आहे. 

अवश्य वाचा- वरुडच्या दोन युवकांचा शेकदरी धरणात बुडून मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या आता 19 झाली. तर सध्या 19 कोरोनाबाधितांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित एका व्यक्तीचा तीन दिवसांपूर्वी हैदराबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. गुरुवारी सात कोरोनाबाधितांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी विनोद म्हशाखेत्री उपस्थित होते. 

loading image