यवतमाळ : नगरसेवकांनीच फेकला पालिकेच्या दारात कचरा

yavatmal
yavatmale sakal

यवतमाळ : शहरातील वडगाव व उमरसरा परिसरातील कचरा उचलला जात नसल्याचा आरोप करीत या भागांतील नगरसेवकांनी शनिवारी (ता.19) कचरा फेको आंदोलन (agitation for garbage yavatmal) केले. आपल्या प्रभागांतील संकलन केलेला कचरा येथील नगरपालिकेसमोर (yavatmal corporation) आणून ती वाहने रिकामी करीत नगरपालिकेत येण्या-जाण्याचा मार्गच बंद केला. दरम्यान, ‘स्वच्छ यवतमाळ बनले कचरायुक्त शहर’ या आशयाचे वृत्त 'सकाळ'ने शनिवारीच प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत नगरसेवकांनी केलेल्या या आंदोलनाने एकच खळबळ उडाली. (corporator agitation for garbage in yavatmal corporation)

yavatmal
लॉकडाउनच्या काळातही शस्त्रक्रिया; एप्रिलपासून २८९ रुग्णांवर शस्त्रक्रिया

शहरातील कचराच्या प्रश्‍नावर आतापर्यंत सर्वच नगरसेवकांनी आंदोलन केले. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच घनकचरा व्यवस्थापनाचा नवा ठेका मंजूर करण्यात आला. मात्र, त्यानंतरही कचर्‍याचा प्रश्‍न अजूनदेखील निकाली निघालेला नाही. वडगाव परिसरातील प्रभाग क्रमांक 24, 25, 27, 28 व उमरसरा भागातील प्रभाग क्रमांक 21 तसेच पाटीपुरा परिसरातील प्रभाग क्रमांक दोन या भागांत मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. या भागांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते. आता कचरा संकलन करतानादेखील या भागाकडे दुर्लक्षच केले जात असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केला आहे. संबंधित ठेकेदाराला घंटागाडी देण्याची मागणी केली होती. मात्र, अजूनही कचरा संकलनासाठी वाहने उपलब्ध करून दिलेली नाहीत. याशिवाय प्रभागांतही स्वच्छता केली जात नसल्याचा आरोपदेखील नगरसेवकांचा आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या या नगरसेवकांनी थेट नगरपालिकेसमोरच प्रभागांतील कचरा फेकला. नियमित स्वच्छता न केल्यास उद्यापासून दररोज नगरपालिकेसमोर कचरा फेकण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे. दरम्यान, या आंदोलनात नगरसेवक मनोज मुधोळकर, कीर्ती राऊत, पंकज मुंदे, संगीता कासार, जीवन देवकते आदी नगरसेवक सहभागी झाले होते. दरम्यान, ‘स्वच्छ यवतमाळ बनले कचरायुक्त शहर’ या आशयाचे वृत्त सकाळने शनिवारीच (ता.19) प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत नगरसेवकांनी केलेल्या या आंदोलनाने एकच खळबळ उडाली.

भाजपचे नगरसेवक आक्रमक -

नगरपालिकेत भाजपचे बहुमत आहे. मात्र, शहरातील कचरा प्रश्‍नावर भाजप नगरसेवकांनाच आंदोलन करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे नगरसेवक कचरा फेकत असताना ठेकेदारांच्या कर्मचार्‍यांनी कचर्‍याचे वाहन नेले. त्यामुळे भाजपच्या नगरसेविका संगीता कासार संतप्त झाल्या. परिणामी नगरपालिकेसमोर असलेला कचरा उचलण्यासाठी आलेली वाहने नगरसेवकांनी परत पाठविली.

कचरा संकलनाचा ठेका भेटून आता जेमतेम आठ दिवस झालेले आहेत. यवतमाळ शहराची लोकसंख्या ही तीन लाखांच्या घरात आहे. एकूण 56 वॉर्ड आहेत. या ठिकाणी काम करण्यासाठी यंत्रणा उभी करायला काही वेळ लागतो. नगरपालिकेकडून अजूनही घंटागाडी दुरुस्त करून देण्यात आलेल्या नाहीत. आम्ही आमचे वाहने लावून दररोज दोनशे मेट्रिक टन कचरा उचलत आहोत. त्यामुळे येत्या काही दिवसांतच शहरातील सर्वच प्रभागांत नियमीत स्वच्छता केली जाईल.
-दिनेश ठाकूर, ठेकेदार, घनकचरा संकलन.
नगरपालिकेत भाजपचे बहुमत आहे. त्यानंतरही भाजपच्या माजी सभापतींना आंदोलन करावे लागते, ही शोकांतिका आहे. यवतमाळ शहरातील कचरा संकलनाचा प्रश्‍न गंभीर असला तरी तो सोडवून नागरिकांना दिलासा देणे महत्वाचे आहे.
- पिंटू बांगर, नगरसेवक, शिवसेना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com