लॉकडाउनच्या काळातही शस्त्रक्रिया; एप्रिलपासून २८९ रुग्णांवर शस्त्रक्रिया

लॉकडाउनच्या काळातही शस्त्रक्रिया; एप्रिलपासून २८९ रुग्णांवर शस्त्रक्रिया

अमरावती : कोरोना विषाणूंसोबत (coronavirus) दोन हात करतानाच अमरावतीत अन्य आजारांवरसुद्धा यशस्वी उपचार करण्यात आले. त्यातूनच एप्रिलपासून अद्यापपर्यंत २८९ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया (Successful surgery on 289 patients) झाली असून, दृष्टिदान सप्ताहात ५३ रुग्णांना दृष्टीलाभ मिळाला आहे. ही कामे निरंतर ठेवण्याबरोबरच मरणोत्तर नेत्रदानासाठी अधिकाधिक व्यक्तींनी संकल्प करण्यासाठीसुद्धा प्रयत्न सुरू असल्याने अमरावती आता रक्तदानासोबतच नेत्रदानात आघाडीवर जात आहे. (Successful-surgery-even-during-the-lockdown-in-Amravati)

सर्वसामान्यपणे नागरिक शासकीय रुग्णालयाऐवजी खासगी रुग्णालयाला पसंती देतात. परंतु, कोरोनाच्या काळात शासकीय रुग्णालयातील गर्दी वाढली आहे. अशा काळात कोरोनाशी लढा देत असतानाच अमरावतीच्या शासकीय रुग्णालयाने अन्य आजारांसंदर्भात देखील तेवढ्याच गांभीर्याने कार्य केल्याचे स्पष्ट होत आहे. मरणोत्तर नेत्रदानासाठी अधिकाधिक व्यक्तींनी संकल्प करणे आवश्यक असल्याने त्यादृष्टीनेसुद्धा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले.

लॉकडाउनच्या काळातही शस्त्रक्रिया; एप्रिलपासून २८९ रुग्णांवर शस्त्रक्रिया
अन् चोरटा घुसला शौचालयात; मालकाने घेतली कडी लावून

विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. जिल्हा सामान्य रुग्णालयात अन्य आजारांवर उपचारासाठी सक्षम यंत्रणा उभी करण्यात आल्यानेच या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. दृष्टिदान दिनानिमित्त सेल्फी पॉइंटचा उपक्रम नेत्रविभागाने राबवला. त्यात ५१ जणांनी नेत्रदानाचा संकल्प केला. त्याचप्रमाणे एहसास करे नेत्रहीन का दर्द हा हरिना फाउंडेशनचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

कारागृहातील बंदीजनांना चष्मे

जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीतर्फे जिल्हा कारागृहात बंदीजनांची नेत्रतपासणी तसेच विनामूल्य चष्मे पुरविण्यात आले. तालुकास्तरावरही नेत्रचिकित्सा अधिकाऱ्यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना विनामूल्य चष्मे दिले, अशी माहिती जिल्हा नेत्रचिकित्सक डॉ. नम्रता सोनोने यांनी दिली.

(Successful-surgery-even-during-the-lockdown-in-Amravati)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com