जमलं रे बुवा... एकदाची झाली खरेदी सुरू, काय वाट पाहावी लागली! 

cotton
cotton
Updated on

राळेगाव (जि. यवतमाळ) : विधानसभा क्षेत्रातील शेतकरी बांधव कोरोना संकटामुळे अडचणीत आले होते. मागील 40 दिवसांपासून कापसाची सीसीआयची खरेदी बंद होती. विभागाचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांच्या पुढाकाराने सीसीआयची खरेदी पुन्हा सुरू झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

40 दिवसांपूर्वी देशात संचारबंदी लागू करण्यात आली. अजून 17 मे पर्यंत संचारबंदी कायम ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे शेतमालाची शासकीय खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या अनुषंगाने विभागाचे आमदार व माजी आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी राळेगाव विधानसभा क्षेत्रातील शेतकरी बंधूंच्या शेतमाल शासकीय खरेदीच्या समस्या थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करून मांडल्या. या संदर्भात 28 एप्रिलला उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात सी.सी.आय. कापूस खरेदीशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अडचणी समजून घेतल्या. शेतकरी बंधूंच्या प्रश्नांची जाण ठेवत कापूस खरेदीसाठी उत्पन्न झालेल्या समस्येची दखल घेत तत्काळ प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. 

अखेर सोमवारपासून (ता.4) राळेगाव तालुक्‍यातील तीन कापूस खरेदी केंद्रांवर संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करून सी.सी.आय.च्या कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात यश आले. कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्या क्षमतेइतक्‍या शेतीमालाच्या वाहनांना परवानगी द्यावी. कृषी उत्पन्न बाजार समितीने कापूस खरेदीकरिता शेतकरी बंधूंना नोंदणी केल्यानुसार प्राधान्य क्रमानुसार एक दिवस आधी मॅसेज व फोन करावा, तसेच 15 मे पर्यंत राळेगाव विधानसभा क्षेत्रातील सर्व शेतकरी बंधूंचा कापूस, तूर, चणा व इतर शेतमाल शासकीय खरेदीच्या माध्यमातून खरेदी करावा, जेणेकरून शेतकरी बंधूंना त्याच्या शेतीमालाचे पैसे जूनच्या पहिल्या आठवड्यात प्राप्त झाले पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी आर्थिक अडचण येणार नाही, अशा सूचना प्रा. डॉ. अशोक उईके यांनी दिल्या आहेत. 

राळेगाव येथे सी.सी.आय. कापूस खरेदीप्रसंगी बाजारसमितीचे सभापती ऍड. प्रफुल्ल मानकर, पंचायत समिती सभापती प्रशांत तायडे, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार रवींद्र कानडजे, सीसीआय अधिकारी उमेश डाबेराव, चित्तरंजन कोल्हे, भालचंद्र कविश्वर, डॉ. कुणाल भोयर तसेच कापूस खरेदी अधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते. 

मागील चाळीस दिवसांपासून कापूस खरेदी बंद होती. त्यामुळे राळेगाव विधानसभा मतदार संघातील कापूस उत्पादक शेतकरी त्रस्त होते. आता सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण मागणी पूर्ण झाली. शिवाय तूर, चणा व इतर शेतमाल शासकीय खरेदीच्या माध्यमातून खरेदी करावा, अशा सूचना आपण संबंधितांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना यामध्ये कोणतीही अडचण जाणार नाही, याकडे माझे सातत्याने लक्ष आहे. 
- प्रा. डॉ. अशोक उईके 
आमदार, राळेगाव विधानसभा. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com