Bharat Band Updates : यवतमाळमधील कापूस खरेदी बंद, पणनसह सीसीआय़च्या केंद्रांवर शुकशुकाट

चेतन देशमुख
Tuesday, 8 December 2020

कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. तो प्रकट करण्यासाठी मंगळवारी भारत बंदची हाक अनेक शेतकरी संघटनांनी दिली आहे. आंदोलनाला जिल्ह्यातील शेतकरी तसेच सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला.

यवतमाळ : केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात आज मंगळवारी (ता.आठ) भारत बंदची हाक शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यांच्या या मागणीला यवतमाळातील अनेक संघटनांचा पाठिंबा आहे. त्यानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असणार आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील कापूस खरेदी एक दिवस बंद ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा - अमरावतीतील बाळाचे मृत्यूप्रकरण : आई, वडिलांची डीएनए चाचणी; इर्विन रुग्णालयात घेतले...

जिल्ह्यात सीसीआयच्या सात, तर पणनच्या तीन केंद्रावर कापूस खरेदी सुरू आहे. कापूस पणन महासंघ व 'सीसीआय'च्या केंद्रांच्या तुलनेत खासगी बाजारातील कापूस खरेदीची उलाढाल वाढली आहे. जिल्ह्यात 'सीसीआय'ने आतापर्यंत जवळपास अडीच लाख क्विंटलच्यावर, तर पणन महासंघाची खरेदी 50 हजार क्विंटलच्यावर पोहोचली आहे. सध्या कापसाची आवक मंदावली असली तरी बऱ्यापैकी केंद्रावर कापूस येत आहे.

हेही वाचा - कुणाच्या काखेर कॅलिपर तर कुणाचा लंगडतच रॅम्पवाॅक, न लाजता गाजवली फॅशन शो स्पर्धा  

कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. तो प्रकट करण्यासाठी मंगळवारी भारत बंदची हाक अनेक शेतकरी संघटनांनी दिली आहे. आंदोलनाला जिल्ह्यातील शेतकरी तसेच सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. बाजार समित्यांनी पाठिंबा देत एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीच बंद राहणार असल्याने सीसीआय तसेच पणनने कापूस खरेदी बंद ठेवली आहे. सीसीआयकडून राळेगाव, खैरी, वणी, शिदोंला, पांढरकवडा, घाटंजी, मुकूटबन ही सात केंद्रे सुरू आहे. पणनकडून यवतमाळ, कळंब व आर्णी ही तीन केंद्रे सुरू आहेत. भारत बंद दरम्यान ही केंद्रेही बंद आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cotton selling centers in yavatmal closed due to bharat band agitation