esakal | भोजनालयात दाम्पत्याने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
sakal

बोलून बातमी शोधा

भोजनालयात दाम्पत्याने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

भोजनालयात दाम्पत्याने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : भोजनालय चालविणाऱ्या संचालक दाम्पत्याने भोजनालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरातील बायपास मार्गावर ही घटना सोमवारी (ता. २६) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. चंद्रभान दुबे (वय ६०), मंजू दुबे (५०) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. (couple-committed-suicide-Chandrapur-Crime-News-suicid-News-nad86)

शहरातील बायपास मार्गावरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर दुबे यांच्या मालकीचे माँ ममता भोजनालय आहे. टॉवर टेकडी जुनोना रोड बाबूपेठ येथे वास्तव्य करणारे चंद्रभान दुबे, मंजू दुबे हे जोडपे भोजनालय चालवीत होते. आज सकाळच्या सुमारास या भोजनालयातून दुर्गंधी येत होती. त्यामुळे काही नागरिकांनी भोजनालयात बघितले असता दोन मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले.

हेही वाचा: शक्तिमानचा मृत्यू; अंत्यसंस्काराला पोलिसांचा ताफा, गॅंगवॉर भडकणार

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली, तेव्हा आत्महत्या करणारे भोजनालय संचालक दाम्पत्य असल्याचे समोर आले. मृतदेह कुजलेल्या स्थितीत होते. त्यामुळे तीन-चार दिवसांपूर्वी त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. शहर पोलिस तपास करीत आहेत.

(couple-committed-suicide-Chandrapur-Crime-News-suicid-News-nad86)

loading image
go to top