esakal | शक्तिमानचा मृत्यू; अंत्यसंस्काराला पोलिसांचा ताफा, गॅंगवॉर भडकण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

शक्तिमानचा मृत्यू; अंत्यसंस्काराला पोलिसांचा ताफा, गॅंगवॉर भडकणार

शक्तिमानचा मृत्यू; अंत्यसंस्काराला पोलिसांचा ताफा, गॅंगवॉर भडकणार

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : अजनीतील स्वयंम नगराळे हत्याकांड घडविणाऱ्या शक्तिमान ऊर्फ शिवम गुरूदे याला जमावाने ठार मारण्याच्या उद्देशाने दगडाने ठेचले होते. गंभीर जखमी अवस्थेत शक्तिमान मेडिकलमध्ये व्हेंटीलेटवर शेवटच्या घटका मोजत असतानाच सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे अजनी पोलिसांनी डबल हत्याकांडाचा गुन्‍हा दाखल केला आहे. शक्तिमानच्या मृत्यूमुळे अजनीत गॅंगवॉर भडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Murder-News-Nagpur-Crime-Police-contingent-funeral-Ajni-Double-Murder-nad86)

शक्तिमान हा कौशल्यानगर येथे जुगाराचा अड्डा चालवायचा. वस्तीतील नागरिक आणि स्वयंमचा या जुगार अड्डयाला विरोध होता. स्वयंमने त्याला जुगाराचा अड्डा बंद करण्यास सांगितले होते. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता. याच वादातून २३ जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास शक्तिमान व तीन साथीदारांनी चाकूने भोसकून स्वयंमचा खून केला होता. या घटनेमुळे जनतेमध्ये रोष निर्माण झाला होता.

हेही वाचा: दर १० मिनिटाला हलतो पाळणा, वर्षाला ५० हजार दाम्पत्याकडे ‘गुड न्यूज'

स्वयंमचा खून केल्यानंतर शक्तिमान हा त्याच्या मामाच्या घरी भांडे प्लॉट येथे पळून गेला. रात्रभर तो मामाच्या घरीच होता. स्वयंमच्या मित्रांनी शक्तिमानचा शोध घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला वस्तीत आणले. शक्तिमानला पाहताच वस्तीतील लोक त्याच्यावर तुटून पडले. विटा, दगड आणि शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. पोलिसांना ही माहिती समजताच त्याला जमावाच्या तावडीतून सोडविले आणि गंभीर अवस्थेत मेडिकलमध्ये भरती केले. उपचार घेत असतानाच सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

चोख बंदोबस्तात अंत्यसंस्कार

शक्तिमानचा मृतदेह वस्तीत नेल्यास नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो, त्यामुळे मेडिकलमधून परस्पर त्याचा मृतदेह मोक्षधाम येेथे नेण्यात आला. त्यावेळी शक्तिमानचे मोजके नातेवाईक हजर होते. त्याचप्रमाणे मोक्षधाम येेथे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठ्या प्रमाणात ताफा हजर होता.

हेही वाचा: अमानुष प्रकार! चौथीच्या विद्यार्थिनीला २०० उठाबशांची शिक्षा

सहा आरोपींना अटक

शक्तिमानच्या खुनात अजनी पोलिसांनी बिरजू वसंत शिंदे, अभिजित दिलीप घोडेस्वार, आकाश कृष्णा मनवर, प्रितम अंबादास कावळे, सुनील वानखेडे आणि सुरेश गोपीचंद कांबळे अशा सहा जणांना अटक केली. पोलिसांनी सर्वांची २८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी घेतली. शक्तिमानच्या मृत्यूमुळे कौशल्यानगरात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उदभवू नये यासाठी तेथेही चोख पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता.

(Murder-News-Nagpur-Crime-Police-contingent-funeral-Ajni-Double-Murder-nad86)

loading image
go to top