वयोवृध्द वडिलांचे पालनपोषण न करणाऱ्या दाम्पत्यास न्यायालयाचा दणका; दंडासोबत सुनावली अनोखी शिक्षा 

संदीप रायपूरे 
Wednesday, 4 November 2020

प्रकरण कोर्टात गेले. अन कोर्टाने दाम्पत्यास चार हजार रूपयाचा दंड ठोठावला.सोबतच कोर्ट संपेपर्यत उभे राहण्याची शिक्षा सुनावली. गोंडपिपरी न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयाने वयोवृध्द वडिलांचे पालनपोषन करण्यासाठी नकार देणाऱ्या मुलांना चांगलाच दणका दिला आहे.    

गोंडपिपरी (जि . चंद्रपूर) :- आयुष्याच्या संध्याकाळी मुलगा आपली काठी बनेल हा विश्वास होता.पण एकाच घरात राहूनही मुलाने वेगळा संसार थाटला. वयोवृध्द एकाकी पडला. अनेक वर्षाच्या वेदंनानी वृध्द वडिलाने शेवटी कठोर निर्णय घेतला आणि पोलिसात धाव घेतली. त्यांनी आपली आपबिती पोलिसांना सांगितली. जेष्ठ नागरिक कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल केला.

प्रकरण कोर्टात गेले. अन कोर्टाने दाम्पत्यास चार हजार रूपयाचा दंड ठोठावला.सोबतच कोर्ट संपेपर्यत उभे राहण्याची शिक्षा सुनावली. गोंडपिपरी न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयाने वयोवृध्द वडिलांचे पालनपोषन करण्यासाठी नकार देणाऱ्या मुलांना चांगलाच दणका दिला आहे.    

हेही वाचा - Success Story: तरुणीने फुलवला मशरूमचा मळा; कृषी शाखेच्या विद्यार्थिनीचा नाविन्यपूर्ण उपक्रम 

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील भगवान ढोहणे हे 74 वर्षाचे जेष्ट नागरिक आहेत.ते स्वतच्या मालकीच्या घरात राहतात.त्यांनी जयंत नावाचा मुलगा आहे.व त्यांचा विवाह झाला असून एक मुलगी आहे.जयंतने आपल्या पत्नी व मुलीसह त्याच घरात वेगळा संसार थाटला.व वडिलांना केवळ एक खोली दिली.दरम्यान मुलगा वडिलंाना कुठेही निघून जा असे वारंवार म्हणायचा. 

वयोवृध्द वडिलांना जेवन देण्यासही दाम्पत्य तयार नव्हते.आपण वयोवृध्द असल्याने काही काम करू शकत नाही. मुलानेही हात काढल्याने आता आपल कस होणार या भितीन भगवानची चिंता वाढली. अनेक वर्षापासून हा वेदंनाचा सिलसिला कायम होता.आयुष्याच्या संध्याकाळी आलेल्या या प्रसंगाने भगवान यंानी कठोर निर्णय घेतला. यांनतर 22 आॅक्टोंबर रोजी ते थेट धाबा पोलीस स्टेशन मध्ये गेले.ठाणेदार सुशिल धोपटे यांची त्यांनी भेट घेतली.

आपल्यावर अनेक वर्षापासून कसा अन्याय होत आहे .याचा पाढाच वाचून दाखविला. शेवटी मुलगा व सुनेविरूध्द तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीसांनी जेष्ठ नागरिक सुधारित कायदयानुसार जयंत व त्याची पत्नी विजयाविरूध्द गुन्हे दाखल केले. ठाणेदार धोपटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार देवाजी निखाडे यांनी या प्रकरणाचा तपास केला.यानंतर हे प्रकरण गोंडपिपरीच्या न्यायालयात दाखल करण्यात आले. आज या प्रकरणात गोंडपिपरीचे न्यायाधीश व्हि.डी.माटे यांनी आज निकाल दिला. वयोवृध्द पित्याचे पालनपोषण करण्यास नकार देणा-या मुलाला व त्याच्या पत्नीला चार हजार रूपयाचा द्रव्यदंड ठोठावण्यात आला.सोबतच कोर्टाचे कामकाज संपेपर्यत या दोघांनाही उभे ठेवण्याची शिक्षा सुनावण्यात आली.

गोंडपिपरीच्या न्यायालयाने आजच्या प्रकरणात दिलेल्या निकालाने वयोवृध्द वडिलांचे पालनपोषण करण्यास मनाई करणा-यांना चांगलाच दणका दिला आहे.याप्रकरणात अँड.राजेश धात्रक यांनी सरकारी वकीलाची भुमिका बजावली. तर धाबा पोलीस स्टेशनचे मुनेश्वर रात्रे यांनी कोर्ट पैरवीची भुमिका बजावली.

नक्की वाचा - बापाच्या डोळ्यासमोरच चिमुकली खेळत होती, पण भरधाव वाहन आलं अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं

धाबा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अनेक गावात जेष्ट नागरिकांना सन्मान द्यावा यासाठी एस पी साहेबांच्या आदेशानूसार मोहिम राबविली. अनेकदा अन्याय होऊन देखील जेष्ट नागरिक आपली आपबिती बोलून दाखवीत नाही. पण जेष्ट नागरिकांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून दिली.या प्रकरणात मा.कोर्टाने दिलेला निकाल हा वयोवृध्द वडीलांना बहिस्कृतासारखे वागविणार्यांना चपराक देणारा ठरेल..
सुशील धोपटे..
ठाणेदार पोलीस स्टेशन धाबा.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Couple who denied to take care of father punished by court